Kangana Ranaut : 'तो पैसे फेकून काहीही करायला लावतो अन् आपण ते पाहतो!'

सध्या बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे.
 Kangana Ranaut shares throwback video Karan Johar
Kangana Ranaut shares throwback video Karan Joharesakal

Kangana Ranaut shares throwback video Karan Johar : बॉलीवूडची क्वीन म्हणून लोकप्रिय झालेल्या कंगनाचा दराराच असा आहे की, तिला ज्या व्यक्तीविषयी राग येतो त्यावर ती टोकाचं विधान करुन मोकळी होते. ती काय बोलून जाते याबाबत तिला काहीही वाटत नाही. यापूर्वी देखील तिनं कित्येकदा अतिशय संतप्त विधानं करुन चर्चेत राहण्याची किमया साधली आहे.

सध्या बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. तब्बल सात वर्षानंतर करणनं दिग्दर्शक म्हणून पुन्हा जोरदार इंट्री केली आहे. त्याचा हा चित्रपट भलेही नेटकऱ्यांच्या टीकेचा विषय ठरत असेल पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.त्याला चांगली ओपनिंगही मिळाली आहे. मात्र यावरुन कंगनानं करणवर टीका केली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

गेल्या दोन दिवसांपासून कंगना आणि करण जोहरमध्ये वाद सुरु झाला आहे. या दोन्ही सेलिब्रेटींमधील भांडणं ही काही नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना नवीन नाही. यापूर्वी देखील त्यांच्यातील वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कंगना तर करण जोहरला बॉलीवूड माफिया असे म्हणते तर करणनं त्याच्या शो मधून कित्येकदा कंगनाची खिल्लीही उडवली आहे. यासगळ्यात कंगनानं आता करणच्या रॉकी और रानीचा समाचार घेतला आहे.

कंगनाला करण जोहरचा तो चित्रपट काही आवडलेला नाही. तिचे म्हणणे आहे की, एवढी बेकार फिल्म एवढी मोठी कमाई कशी काय करु शकते. करण हा मोठा निर्माता आहे त्याच्याकडे खूप सारे पैसे आहेत. त्यामुळे तो पैसे फेकून काहीही करु शकतो आणि प्रेक्षक ते पाहतात. असे कंगनाला वाटते. कंगनाच्या या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांनी देखील तिच्यावर टीका केली आहे.

करणच्या रॉकी और रानीनं पहिल्याच दिवशी अकरा कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी सोळा कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे आतापर्यत या चित्रपटानं २७ कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात कंगना मात्र सारखे व्हिडिओ शेयर करुन करण जोहरवर संतप्त प्रतिक्रिया देत सुटली आहे. तिनं ज्यांनी चांगले रिव्ह्यू केले आहेत त्यात करणचं मोठं योगदान असल्याचे म्हटले आहे.

 Kangana Ranaut shares throwback video Karan Johar
Rocky Aur Rani Ki Prem Kahani Review : हँगलेला रॉकी अन् अतिशहाण्या रानीची 'मंद कहाणी'! करण आला माती करुन गेला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com