सिद्धार्थ आणि मितालीचा शाही लग्नसोहळा; पहा 'टायनी पांडाचा' ग्रॅन्ड लूक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

पुण्यातील प्रसिद्ध 'ढेपे वाडा' येथे २४ जानेवारीला मिताली आणि सिद्धार्थचा शाही सोहळा पार पडला.या सोहळ्याची सुरवात मितालीच्या ग्रँड एन्ट्रीने झाली. डोलीमधून मितालीला मंडपात आणले. मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

पुणे : मराठी चित्रपट सृष्टीतील  प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा नुकताच लग्न समारंभ पार पडला. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. त्यांच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमांच्या फोटोला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळाली. सिद्धार्थ आणि मिताली हळदी समारंभा दिवशी जोरदार डान्स केला. त्यांच्या डान्सचे व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध 'ढेपे वाडा' येथे २४ जानेवारीला मिताली आणि सिद्धार्थचा शाही सोहळा पार पडला.या सोहळ्याची सुरवात मितालीच्या ग्रँड एन्ट्रीने झाली. डोलीमधून मितालीला मंडपात आणले. मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

खोपा, नथ, चंद्रकोर असा श्रुंगार मितालीने केला होता या मराठमोळ्या लुकमध्ये मिताली खुप सुंदर दिसत होती. मिताली नंतर सिद्धयर्थंची मंडपात एन्ट्री झाली.

रॉयल ब्लू रंगाचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतर असा लुक सिद्धार्थने केला होता. या पोशाखात सिद्धार्थ रुबाबदार दिसत होता. सप्तपदीसाठी मिताली आणि सिद्धार्थने असा लुक केला होता. विधी झाल्यावर अक्षतांसाठी दोघेही वेगळ्याच लूकमध्ये होते. 

 

सिद्धार्थ मितालीच्या लग्नसोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळीही उपस्थित होते. शाही लग्न सोहळ्याला अभिज्ञा भावे, इशा केसकर, उमेश कामत, पूजा सामंत, भूषण प्रधान या चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील कलाकारांनी हजेरी लावली.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The royal wedding of Siddharth chandekar and Mitali Mayekar Marathi Actress