दोन स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा सांगणारा ''आरआरआर''

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 23 October 2020

मुळातच या चित्रपटाच्या नावाविषयीही अनेकांना कमालीचे कुतूहल आहे. याबाबत राजामौलिने अधिकृत कुठलाही खुलासा केलेला नाही. या कथेतून स्वातंत्र्यपूर्व काळाचा आढावा घेण्यात आला आहे. अलुरी सिथारामराजु आणि कोमराम भीम यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा याची कथा चित्रपटांतून मांडण्यात आली आहे.

मुंबई - एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाचा दुसरा टिझर नुकताच व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. याअगोदर बाहुबली चित्रपटामुळे सगळ्यांच्या चर्चेचा विषय झालेल्या राजामौली यांची ही कलाकृती एका काल्पनिक घटनेवर आधारित आहे. मात्र या चित्रपटाची संकल्पना ही चे गव्हेराच्या मोटार सायकल डायरीजवर आधारलेली आहे असे सांगण्यात आले आहे. तर कथा ही दोन स्वातंत्र्यनायकांवर बेतलीली आहे.

मुळातच या चित्रपटाच्या नावाविषयीही अनेकांना कमालीचे कुतूहल आहे. याबाबत राजामौलिने अधिकृत कुठलाही खुलासा केलेला नाही. या कथेतून स्वातंत्र्यपूर्व काळाचा आढावा घेण्यात आला आहे. अलुरी सिथारामराजु आणि कोमराम भीम यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा याची कथा चित्रपटांतून मांडण्यात आली आहे. त्यांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यासाठी राजामौलिने एक मोठे शिवधनुष्य़ पेलले आहे. ते आता त्याला पेलवणार का ? हे चित्रपट पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही. परंतु नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरवरुन त्याच्यातील भव्यतेची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या बाहुबली द कनक्लुजन या चित्रटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला होता. आरआरआरच्या निमित्ताने त्याची पुनरावृत्ती होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यातील दोन स्वातंत्र्यवीरांची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे. ज्या दोन स्वातंत्र्यवीरांची नावे अलुरी सितारामा राजु आणि कोमराम भीम अशी आहेत. स्वातंत्र्यासाठी त्यांनी उभारलेला लढा, त्याचे मोठ्या मोहिमेत झालेलं रुपांतर हे सारे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. आपल्या घरापासून दूर राहून स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्राणाची बाजी लावणा-या दोन वीरांची संघर्षगाथा यातून उलगडली जाणार आहे. भव्य सेट, लक्षवेधी ग्राफिक, अफलातून छायाचित्रण आणि ज्युनिअर नटराजनचा जबरदस्त अनुभव यामुळे ट्रेलर प्रचंड लोकप्रिय होतो आहे. या अगोदर राम चरण करत असलेल्या अलुरी सिथाराम राजू याचाही ट्रेलर प्रसिध्द करण्यात आला होता. आता कोमराम भीम या भूमिकेतील ज्युनिअर नटराजनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ज्युनिअर नटराजनचे चाहत्यांनी त्याच्या .या नव्या भूमिकेचे कौतूक केलं आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Presenting Bheem to you!!! #RRRMovie #RRR

A post shared by RRR Movie (@rrrmovie) on

या चित्रपटात आणखी अजय देवगण, अलिया भट, शिरिया सरन यांच्याही भूमिका आहेत. नव्याने प्रदर्शित करण्यात आलेल्या टिझरवर राजामौलिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. 300 कोटीपेक्षा जास्त बजेट असलेला हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील दोन भटक्या समाजातील नेत्यांची लढाई या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आली आहे. 

 

 
 

 
 

 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RRR is a fictional tale about two warriors Alluri Seetharamaraju and Komaram Bheem