Oscar Award: RRR काय ऑस्करचा मुव्ही आहे का? दिग्दर्शकाची खोचक प्रतिक्रिया

एस एस राजामौली यांच्या आरआरआरनं केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये आपल्या नावाची वेगळी छाप उमटवली होती.
SS Rajamouli RRR movie
SS Rajamouli RRR movie Google

RRR Oscar Nomination Movie: एस एस राजामौली यांच्या आरआरआरनं केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये आपल्या नावाची वेगळी छाप उमटवली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं हजार कोटींची कमाई करुन पुन्हा एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आरआरआर हा भारताकडून ऑस्करसाठी पाठविण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक गौतम मेनन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे. दुसरीकडे ते ट्रोल होताना दिसत आहेत.

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात चाहत्यांना वेध लागले आहे. ऑस्करसाठी दरवर्षी भारताकडून वेगवेगळ्या चित्रपटांची नावे पाठवली जातात. मात्र अद्याप त्यातील कुणालाही ऑस्करवर आपले नाव कोरता आलेले नाही. राजामौली यांच्या आरआरआरची चर्चा होती. मात्र पॅन नलिन दिग्दर्शित छेलो शोच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं पुन्हा एका वेगळ्या वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यावर गौतम मेनन यांनी प्रतिक्रिया दिलीय.

गौतम म्हणाले, मला वाटत नाही की, आरआरआर हा ऑस्कर मटेरियल मुव्ही आहे, असं काय आहे त्यात की त्याला ऑस्करसाठी पाठवावं. एका मुलाखतीमध्ये गौतम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जी चर्चेत आली आहे. दुसरीकडे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं छेलो शोवर तो चित्रपट दुसऱ्या एका चित्रपटाचा कॉपी असल्याचा आक्षेप घेतल्यानं आता पुन्हा एकदा आरआरआरच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. गौतम यांच्या प्रतिक्रियेनं मात्र सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

SS Rajamouli RRR movie
Raveena Tondon: रविनानं पुन्हा धरलं बाळसं! कसली दिसतीये...

नलिनचा छेलो शो हा 14 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. इंडिया टूडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गौतम यांनी आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, छेलो शो आणि आरआरआरच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या चित्रपटाला संधी देण्याची गरज होती. या दोन्ही चित्रपटांविषयी मी खूप काही ऐकले आहे. मात्र त्यांना जर ऑस्कर मिळाला तर आनंदच होईल. असेही गौतम यांनी म्हटले आहे.

SS Rajamouli RRR movie
Nikki Tamboli: निक्कीला पाहावं, शांत व्हावं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com