
Oscar 2023: ऑस्करमध्ये लाइव्ह वाजणार ‘नाटू नाटू’ गाणं; अकादमीचं अधिकृत ट्वीट..
Oscar 2023: जगातील सर्वात प्रतिष्ठित अकादमी पुरस्काराची म्हणजेच ऑस्कर पुरस्काराची सध्या सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. हा सोहळा पाहण्यासाठी सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा 13 मार्च 2023 रोजी ऑस्कर विजेत्या चित्रपटांची घोषणा होणार आहे.
यामध्ये आनंदाची बातमी म्हणजे ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. ज्यामध्ये 'आरआरआर' चित्रपटाच्या 'नाटू नाटू' गाण्याला नामांकन मिळालं. अशातच अकादमीने दुसरी आनंदाची बातमी ट्विट करत शेयर केली.
२८ फेब्रुवारी रोजी अकादमीने ट्विट करत यादसंदर्भात घोषणा केली. ऑस्कर सोहळ्यात 'नाटू नाटू' गाण्याचं लाइव्ह सादरीकरण केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. “राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव ‘नाटू नाटू’ ९५ व्या अकादमी पुरस्कारात लाइव्ह,” असं या ट्विट मध्ये म्हंटलं आहे.
'नाटू नाटू' गाण्याला 'बेस्ट ओरिजनल साँग' कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. त्यामुळे दा हे गाणं भारताला ऑस्कर मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संगीतकार एमएम कीरावानी सध्या या सोहळ्यासाठी लाइव्ह सादरीकरणाची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या गाण्यातील अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हे स्टेजवर दिसतील का, ते नाचतील याबाबत कोणीतही अधिकृत माहिती नाही.