गोल्डन ग्लोब मिळाल्यानंतर राजामौलींची पहिलीच प्रतिक्रिया, 'आज मला..'| RRR Natu Natu Won Golden Globe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR Natu Natu Won Golden Globe

RRR Natu Natu Won Golden Globe : गोल्डन ग्लोब मिळाल्यानंतर राजामौलींची पहिलीच प्रतिक्रिया, 'आज मला..'

RRR Natu Natu Won Golden Globe Awards SS Rajamouli Reaction : दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटानं इतिहास घडवला आहे. त्या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच राजामौली यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

यंदाच्या वर्षी तब्बल पाच भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहे. त्यांना वेगवेगळ्या कॅटगिरीमध्ये ते ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाले आहेत. आरआरआऱची टीम हा पुरस्कार स्विकारण्यासाठी अमेरिकेला गेली होती. तिथल्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये चर्चा रंगली होती ती रिहाना आणि राजामौली यांची.

Also Read - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

रिहानानं तर फ्लाईंग किस करत राजामौली यांना ग्रिट केले होते. त्यानंतर राजामौली यांनी देखील दिलखुलासपणे त्यावर प्रतिक्रिया देत तिला हसून दाद दिली होती. आता राजामौली त्यांच्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आहे. पुरस्कार स्विकारल्यानंतर ते कमालीचे भावूक झाले होते. त्यांची प्रतिक्रिया ही नेटकऱ्यांच्या कौतूकाचा विषय ठरताना दिसत आहे.

राजामौली आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणतात की, हा काही आऱआऱआऱचा विजय नाही. तो भारतीय सिनेमाचा आहे. मला पेडण्णा, एमएम किरवानी गरु यांचे खास अभिनंदन करायचे आहे. त्यांच्या कष्टाला तोड नाही. त्यांच्यामुळेच हे सगळे काही शक्य झाले. प्रत्येकानं खूप कष्ट घेतले. कलाकारांना घडवणं, त्यांच्याकडून गोष्टी करुन घेणे अवघड गोष्ट आहे.

हेही वाचा: Indian Movie Oscar Nomination: ...म्हणून भारतीय चित्रपटांना 'ऑस्कर' मिळत नाही?

गोल्डन ग्लोब मिळणं ही मोठी गोष्ट आहे. नाटू नाटूवर जग आज थिरकतंय ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. राजामौली यांच्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नाटू नाटूला गोल्डन ग्लोब मिळता क्षणीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजामौलींचे कौतूक केले आहे.

हेही वाचा: RRR च्या 'नाटू नाटू' ला गोल्डन ग्लोब मिळताच ट्विटरवर भारतीयांचा नाचू नाचू..