“दोन्ही इंडस्ट्रीतील…”,अमेरिकन ॲक्सेंटवरून ट्रोल झाल्यावर Jr NTR ने दिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NTR Jr

“दोन्ही इंडस्ट्रीतील…”,अमेरिकन ॲक्सेंटवरून ट्रोल झाल्यावर Jr NTR ने दिली प्रतिक्रिया

एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाने देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने यापूर्वी गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकून जगभर चर्चेचा विषय बनवला आहे. चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्वजण आरआरआरच्या टीमचे अभिनंदन करत आहेत.

अलीकडे भारतीय क्रिकेटपटूही आरआरआर चित्रपटाच्या कलाकाराचे विशेष प्रकारे अभिनंदन करत आहेत. दोन भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि युझवेंद्र चहल यांनी चित्रपटाचा अभिनेता ज्युनियर एनटीआर यांची भेट घेतली आणि अभिनंदन केले. दरम्यान, ज्युनियर एनटीआरने एका मुलाखतीदरम्यान अमेरिकन इंग्रजी बोलल्याबद्दल ट्रोल झाल्यामुळे त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: Movie Ticket Price : चित्रपटप्रेमींसाठी २० जानेवारीला 'सिनेमा लव्हर्स डे'! काय आहे भन्नाट ऑफर?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, ज्युनियर एनटीआरने फेक अ‍ॅक्सेंटवर ट्रोल केल्यामुळे प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, "भारतीय सिनेमा आणि हॉलीवूडमध्ये फारसा फरक नाही. वेळ आणि अ‍ॅक्सेंट या बाबतीत आपण फक्त त्यांच्यापेक्षा थोडे वेगळे आहोत. याशिवाय दोन्ही इंडस्ट्रीतील कलाकार एकाच प्रक्रियेतून जातात".

खरं तर, ज्युनियर एनटीआर आणि चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली पूर्वी अमेरिकेत होते. ज्युनियर एनटीआर तिथे एका कार्यक्रमादरम्यान अमेरिकन इंग्रजी बोलताना दिसला. त्यानंतर एनटीआरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. लोक त्याच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीला खोटे म्हणत.