Rubina Dilaik: कितीही लपवलं तरीही.. बिग बॉस फेम रुबीना गरोदर? समोर आला फोटो

एक फोटो व्हायरल झाल्याने बिग बॉस फेम रुबीना डीलैक गरोदर असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय
Rubina Dilaik Pregnant? Netizens Spot Baby Bump  She Takes doing pooja of Lord Ganesha
Rubina Dilaik Pregnant? Netizens Spot Baby Bump She Takes doing pooja of Lord GaneshaSAKAL

Rubina Dilaik Engagement News: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रुबिना डीलैक चाहत्यांची आवडती अभिनेत्री. रुबिनाने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करुन चर्चांना उधाण आणलंय. रुबिनाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे आणि चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

रुबीनाचे फोटो व्हायरल झाल्यापासून तिच्या गरोदरपणाची चर्चा सुरू झाली होती. या फोटोत तिचा बेबी बंप स्पष्ट दिसतोय. आता पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोंमध्ये चाहत्यांच्या नजरा तिच्या बेबी बंपवर गेल्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे.

(Rubina Dilaik Pregnant? Netizens Spot Baby Bump She Takes doing pooja of Lord Ganesha)

Rubina Dilaik Pregnant? Netizens Spot Baby Bump  She Takes doing pooja of Lord Ganesha
Madhurani Prabhulkar: फॅनने दिले असं गिफ्ट की मधुराणी प्रभुलकरच्या डोळ्यात आलं पाणी, व्हिडीओ व्हायरल

काय आहे रुबिनाचा फोटो?

रुबिना डीलैकने तिचा वाढदिवस पती अभिनव शुक्लासोबत साजरा केला. फोटोमध्ये रुबिना आणि तिचा पती अभिनव गणेशाच्या मूर्तीसमोर प्रार्थनेत मग्न आहेत. लोकांचं लक्ष रुबिनाच्या ड्रेसकडे गेलं. ज्यामध्ये सगळ्यांना तिचा बंप स्पष्ट दिसत होता. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. तू माझ्या प्रिय अभिनवसाठी प्रत्येक वर्ष खास बनव." अशी पोस्ट रुबीनाने केलीय.

चाहत्यांनी स्पॉट केला रुबीनाचा बेबी बंप?

हे फोटो पाहिल्यानंतर लगेचच रुबिना गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. नेटिझन्सने रुबिनाच्या कमेंट सेक्शनमध्ये अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. काहींनी चित्रात स्पष्टपणे दिसणारा बेबी बंप दाखवला.

एकुणच रुबीनाने गरोदरपणाच्या गोष्टी अमान्य केल्या असल्या तरीही तिच्या फॅनच्या नजरेतुन तिचं बेबी बंप सुटलं नाही.

Rubina Dilaik Pregnant? Netizens Spot Baby Bump  She Takes doing pooja of Lord Ganesha
Akshaya Deodhar: लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरीत अक्षया देवधरची मेहंदी सजली, व्हिडीओ व्हायरल

रुबीना गरोदरपणाच्या गोष्टींवर काय म्हणाली होती...

काही दिवसांपूर्वी रुबीनाने मात्र तिच्या गरोदरपणाच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. रुबिना म्हणाली होती, "एक पब्लिक फीगर म्हणून मला माहीत आहे की माझ्याबद्दल अफवा आणि चर्चा सुरूच असतात. मला माहित आहे की मी याबद्दल फार काही करू शकत नाही, म्हणून मी या गोष्टींचा त्रास घेत नाही."

आता रुबिना खरंच गरोदर आहे की नाही? हे मात्र स्वतः तिच्याकडून जाहीर झाल्याशिवाय आपण सांगू शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com