OMG ! मध्यरात्री विकी आणि कॅटरीना एकत्र स्पॉट झाले

वृत्तसंस्था
Thursday, 23 January 2020

बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांचा छुपछुपके भेटण्याचा सिलसिला सुरु आहे. सध्या बी-टाऊनमध्ये चर्चा आहे ती, विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्या अफेअरची !

मुंबई : बॉलिवूडमध्ये नेहमीच काहीतरी घडत असतं. बॉलिवूड हे खूप हॅपनिंग आहे आणि त्यामुळे मनोरंजनापलिकडेही इथे काहीनाकाही होत असतं. दीपिका-रणवीर, अनुष्का-विराट आणि प्रियांका-निक या कपलने लग्न करुन एक नवीनच ट्रेंड बॉलिवूडमध्ये सुरु केला आहे. मात्र अस अनेक कपल आहेत ज्यांचा छुपछुपके भेटण्याचा सिलसिला सुरु आहे. सध्या बी-टाऊनमध्ये चर्चा आहे ती, विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्या अफेअरची !

विकी आणि कॅटरीना यांच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरु असली तरी मात्र त्या दोघांनी अधिकृतपणे हे मान्य केलेलं नाही. असं असलं तरी मात्र हे कपल पुन्हा एकत्र स्पॉट झाले आहेत. या दोघांना मित्राच्या डिनर पार्टीमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

दिग्दर्शक अली अब्बाज झफ्फर याच्या घरी वाढदिवसानिमित्त पार्टी होती. या पार्टीला बॉलिवूडचे अनेक कलाकार मंडळी आली होती. याच पार्टीला कॅटरीना आणि विकीनेदेखील हजेरी लावली होती. या पार्टीला ते दोघं वेगवेगळे गेले होते आणि तरीही या कपलची चर्चा झाली. पण, पॅपाराझींच्या कॅमेरातून या दोघांची सुटका झाली नाही आणि ते कैद झाले. 
त्या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कपलची चर्चा सुरु आहे आणि शिवाय चाहत्यांनी या कपलला पसंती दिली आहे. या दोघांच्या अफेअरची चर्चा मागिल वर्षीपासून सुरु आहे. विकीचं याआधी हरलीन सेठीसोबत नाव जोडलं गेलं होतं. 

मागिल वर्षी 2019 मध्ये कॅटरीनाचा 'भारत' हा सिनेमा रिलिज झाला. यावर्षी ती अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी' मध्ये दिसणार आहे. तर, विकीचा 'उरी' हा सिनेमा सुपरहिट ठरला. यावर्षी 'सरदार उदाम सिंह' आणि 'भूत : दी हॉन्टेड शिप' हे दोन चित्रपट रिलिज होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumored couple Vicky kaushal and Katrina kaif spotted late night