अमिताभ यांचा फोन आला, रुना साहा थेट केबीसीच्या हॉट सीटवर 

युगंधर ताजणे
Friday, 16 October 2020

गुरुवारी झालेल्या शो मध्ये अमिताभ यांनी दिलेल्या धक्क्यामुळे प्रेक्षक सावरले नाहीत. पश्चिम बंगाल येथील रुना साहा या पहिल्या महिला स्पर्धक आहेत ज्यांनी इतर कुठल्याही पात्रता फेरीशिवाय थेट हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवला आहे.

मुंबई - लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचा फॉरमॅट कसा आहे याविषयी अधिक काही सांगण्याची गरज नाही. तो सर्वांना माहिती आहे. यात सहभागी व्हायचे असल्यास सर्वात प्रथम कोणते अडथळे पार करावे लागतात हे सहजच कुणालाही सांगता येईल. मात्र रुना साहा यांची थेट केबीसीच्या हॉट सीटवर झालेली इंट्री सगळ्यांना आश्चर्यचकित  करणारी आहे. केबीसीच्या 12 व्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे.

प्रचंड लोकप्रिय असलेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे करत आहेत. आपल्या भारदस्त आवाजात त्यांनी केलेल्या सुत्रसंचालनामुळे  या कार्यक्रमाची उंची वाढली आहे. सर्वांच्या आकर्षणाचा विषय असलेल्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता काही नियमावली आहे. परंतू गुरुवारी झालेल्या शो मध्ये अमिताभ यांनी दिलेल्या धक्क्यामुळे प्रेक्षक सावरले नाहीत. पश्चिम बंगाल येथील रुना साहा या पहिल्या महिला स्पर्धक आहेत ज्यांनी इतर कुठल्याही पात्रता फेरीशिवाय थेट हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवला आहे. म्हणजे त्या fastest finger first round न खेळता कौन बनेगा करोडपतीच्या प्रश्नावलीला सामो-या गेल्या आहेत.

तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळे कसे शक्य झाले ? त्याचे झाले असे की, साहा या आठवड्यातील शेवटच्या स्पर्धक  होत्या. नियमानुसार त्यांना फोन करुन त्यांची fastest finger first round साठी निवडही झाली. मात्र ज्यावेळी हा राऊंड खेळण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्यासमोर कुठलाही स्पर्धक नव्हता. त्यामुळे त्यांना थेट सहभागी होण्याची संधी मिळाली.  साहा या गृहिणी असून त्या साडी विक्रीचा व्यवसाय करतात. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी साहा यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केले आहे. अखेर त्यांना यश आले आहे.

गुरुवारी अमिताभ बच्चन यांनी त्यांना फोन केला आणि या शो मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. यावेळी साहा या खुप भावनिक झाल्याचे दिसून आले. आपल्याला अखेर या कार्यक्रमात सहभागी व्हायला मिळाले यामुळे त्यांना आनंदाच्या भरात रडू कोसळले. अमिताभ यांनी त्यांना धीर देत त्या सहभागी झाल्याबद्दल कौतूक केले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Runa Saha creates history becomes first contestant to get to hot seat directly