सचिन आणि श्रिया पिळगांवकर या बाप-लेकीची ही जुगलबंदी पाहिली का?

sachin
sachin

मुंबई- लॉकडाऊनमुळे सध्या सगळेच जण घरात अडकून पडले आहेत..याला  सेलिब्रिटीही अपवाद नाहीत..शूटींग बंद असल्याने सेलिब्रिटीही घरीच आहेत..नेहमीच शूटींगमुळे व्यस्त असलेले सेलिब्रिटी सध्या घरातंच वेळ घालवत आहे.. कोणी घरातील साफ सफाई करण्यात मग्न आहे तर कोणी फिटनेस कडे जास्त लक्ष देत आहेत..तसं पाहायला गेलं तर एकामागोमाग एक सिनेमा आणि इतर कार्यक्रमांच्या शूटींगमुळे या सेलिब्रिटींना त्यांच्या घरातील मंडळींना वेळ देत येत नव्हता..त्यांच्यासोबत गप्पा, चर्चा क्वचितंच करायला मिळत होती..मात्र या लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटी स्वतःच्या कुटुंबाला आवर्जुन वेळ देत आहेत..त्यांच्यासोबत घालवत असलेला वेळ ते सोशल मिडीयावर देखील चाहत्यांसाठी शेअर करत आहेत..अशीच एका सेलिब्रिटी बाप-लेकीची जोडी लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी जुगलबंदी करताना दिसून आली..

अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मुलगी श्रिया पिळगांवकरसोबत गाणं गातानाचा एक व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे..या व्हिडिओमध्ये हे दोघं हाल कैसा है जनाब का? या गाण्यावर जुगलबंदी करत आहेत..सचिन यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिलं आहे, 'आम्ही दोघं हे गाणं श्रिया चार वर्षाची असल्यापासून एकत्र गातो..हाल कैसा है जनाब का? ती अजुनही माझ्यासाठी लहानंच आहे आणि हे गाणं नेहमीच आमच्यासाठी स्पेशल राहणार आहे..' 

सचिन यांचा आवाज अनेकदा प्रेक्षकांनी ऐकला आहे मात्र मुलगी श्रिया हीचा आवाज ऐकून प्रेक्षकांनी तिचं चांगलंच कौतुक केलं आहे..काही दिवसांपूर्वी सुप्रिया पिळगांवर यांनी डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता.. 

पन्नाशीतही त्यांचा हा ग्रेसफुल डान्स पाहून प्रेक्षक त्यांच्या प्रेमात पडले होते..सुप्रिया यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता आणि आता सचिन-श्रिया या बापलेकीचा हा गाण्याचा व्हिडिओ प्रेक्षकांना भावतोय.. 

sachin pilgaonkar and shriya pilgaonkar singing a song together during lockdown   
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com