
आता ज्य़ेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकरही स्वतःला फिट ठेवण्य़ासाठी घरातच व्यायाम करताना दिसून आले आहेत.
मुंबई: सध्या करोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण घरात बसून सोशल डी स्टन सिंग पाळत आहेत. अश्यातच देशभरातील चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. यामुळे अनेक कलाकार आपापल्या परीने आपला विरंगुळा करताना दिसतात. कलाकारही हा क्वारंटाईनचा काळा एन्जॉय करत आहेत. यात कोणी भांडी घासताना दिसलं, कोणी चित्रकला करताना अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आवडी-निवडी जपताना दिसले.
लॉकडाऊनमुळे जिम आणि फिटनेस सेंटर्स देखील बंद आहेत. त्यामुळे कालाकार घरातच आपला वर्कआऊट करताना दिसून आले. यातच आता ज्य़ेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकरही स्वतःला फिट ठेवण्य़ासाठी घरातच व्यायाम करताना दिसून आले आहेत. ते किक बॉक्सिंग करत स्वतःला फिट ठेवत आहे. त्यांनी याबाबत एक व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये ते किक बॉक्सिंगचे ग्लोव्ह्ज घालून पंचेज मारताना दिसत आहे. 'मी स्वतःला फिट आणि हेल्थी ठेवण्यासाठी हे करतो.' असे त्यांनी ही पोस्ट शेअर करत त्यावर कॅप्शन दिले आहे.
किक बॉस्किंगशिवाय ते वेगवेगळ्या दिवशी फंक्शनल ट्रेनिंग, क्रॉस ट्रेनिंग, कार्डिओ देखील करतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हे सर्व व्यायामाचे प्रकार करताना फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत असतात. हे व्हिडिओ शेअर करताना त्यांनी प्रेक्षकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.