Taarak Mehta: शैलेश लोढा Out, सचिन श्रॉफ साकारणार तारक मेहता, शूटिंग सुरू Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sachin shroff is going to replace shailesh lodha in taarak mehta ka ooltah chashmah

Taarak Mehta: शैलेश लोढा Out, सचिन श्रॉफ साकारणार तारक मेहता, शूटिंग सुरू

Taarak Mehta:तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त चर्चेत आहे ते अनेक बड्या कलाकारांनी एकापाठोपाठ एक मालिकेला रामराम केल्यामुळे. आधी दयाबेन आणि नंतर मालिकेतलं आणखी एक चर्चेतलं पात्र तारक मेहता साकारणारे शैलेश लोढा यांनी तब्बल १४ वर्षानंतर तारक मेहता मालिकेला रामराम केला. त्यामुळे तर मालिकेचे चाहते आणखीनच नाराज झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून निर्माते तारक मेहता साकारणाऱ्या शैलेश लोढा यांच्या वाटेकडे नजर लावून होते. अधनंमधनं तारक मेहता साकारणाऱ्या संभाव्य कलाकारांची नावं कानावर पडत होती. त्यात काहीच तथ्य नव्हतं असं दिसतंय. कारण आता टी.व्ही अभिनेता सचिन श्रॉफचं नाव समोर येत आहे.(sachin shroff is going to replace shailesh lodha in taarak mehta ka ooltah chashmah)

हेही वाचा: मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन विषयी दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय,वाचा सविस्तर

शैलेश लोढा यांनी तारक मेहताचं शूट अचानक बंद केलं आणि तेव्हापासून गेले काही महिने ती व्यक्तिरेखा मालिकेत दिसेनाशी झाली. मेकर्स शैलेश लोढा यांचे मन वळवता वळवता थकले अन् नवीन अभिनेत्याचा शोध घेऊ लागल्याची बातमी समोर आली. आता कळत आहे की अनेक कलाकारांच्या चर्चेनंतर अखेर टी.व्हीचा हॅन्डसम हंक सचिन श्रॉफचं नाव तारक मेहता भूमिकेसाठी निश्चित झालं आहे. दोन दिवसांचे शूटही सचिनने केल्याचं समोर आले आहे. यासंदर्भात सचिन श्रॉफला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला पण तो होऊ शकला नाही. सचिन श्रॉफ हा टी.व्ही अभिनेत्री जुही परमारचा पूर्वाश्रमीचा पती आहे. टी.व्हीचा हॅन्डसम अभिनेता म्हणून त्याची ओळख असण्यासोबतच तो एक व्यावसायिकही आहे. त्यानं अनेक मालिकांमधून आतापर्यंत काम केलं आहे. शेवटचा तो 'आश्रम' या बॉबी देओलच्या वेब सिरीजमध्ये आणि टी.व्ही वरील 'गुम है किसी के प्यार मे' मालिकेत दिसला होता.

हेही वाचा: गेम चेंजर...प्राजक्ता माळी

तारक मेहता साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी मार्च २०२२ मध्ये मालिकेचं शूटिंग थांबवलं होतं. बातमी आहे की शैलेश लोढा खूश नव्हते. त्यांना वाटत होतं की आपल्या तारखांचा योग्य पद्धतीनं शो साठी वापर केला जात नाही. तसंच,लोढा यांना काही वेगळ्या गोष्टीही करायच्या होत्या. मालिकेत काम करत असल्यामुळे त्यांनी अनेक चांगल्या प्रोजेकट्सना नकार दिला होता. पण आता त्यांना नवीन काहीतरी करायचं होतं. मालिकेला राम राम केल्यानंतर शैलेश लोढा 'वाह भाई वाह' मध्ये दिसत आहेत.

Web Title: Sachin Shroff Is Going To Replace Shailesh Lodha In Taarak Mehta Ka Ooltah

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..