इथून पुढे बोलण्याआधी.. काश्मीरी पंडित वादावर साई पल्लवीचं भावूक स्पष्टीकरण

काश्मिरी पंडितांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर अखेर साई पल्लवी बोलली आहे.
Sai Pallavi issues clarification after controversy, says she was not belittling any tragedy
Sai Pallavi issues clarification after controversy, says she was not belittling any tragedysakal

sai pallavi : आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाबाबत तिने एक मत व्यक्त केले. ज्यामध्ये तिने काश्मिरी पंडितावर झालेल्या जुलूमाची तुलना मॉब लिंचिंग सोबत केली. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातून मोठा वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे तिच्या विरोधात पोलीस तक्रारही दाखल झाली. अखेर या वादावर साई पल्लवीने मौन सोडले आहे. एक व्हिडिओ शेअर करत तिने स्पष्टीकरण दिले आहे. (sai pallavi statement on kashmiri pandit) (Sai Pallavi issues clarification after controversy, says she was not belittling any tragedy)

साई म्हणाली होती की, मी तटस्थ वातावरणात वाढले आहे. मी डाव्या आणि उजव्या विचारसरणीबद्दल ऐकले आहे. पण, कोण बरोबर आणि कोण चूक हे मी सांगू शकत नाही. 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट दाखवतो की काश्मीरी पंडितांची हत्या करण्यात आली. तर अलीकडेच एका व्यक्तीची गायीची वाहतूक करत असताना मुस्लिम असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली.त्या व्यक्तीला मारल्यानंतर हल्लेखोरांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या. मग काश्मीरमध्ये जे घडले आणि नुकत्याच झालेल्या या घटनेत फरक काय आहे? तिच्या या विधानानंतर मोठा गदरोळ मजला. तिच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली. अखेर साईने यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

साई पल्लवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलं, असं ती म्हंटली आहे. ती म्हणाली, 'अशा माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतेय हे पहिल्यांदाच घडतंय. पण मी कायमच मनात जे असेल तर बोलत आले आहे. मला माहिती आहे की मी माझी बाजू मांडण्यास थोडा उशीर केला, पण मला माफ करा. कारण मी केलेलं विधान खूप चुकीच्या पद्धतीने तुमच्या समोर समोर आणलं गेलं. मला फक्त इतकंच म्हणायच होतं की धर्माच्या नावाने कोणताही वाद चुकीचा आहे. मी एक न्यूट्रल व्यक्ती आहे. माझ्या बोलण्यानंतर बाहेर जे काही घडलं ते पाहून मला स्वत:लाच मोठा धक्का बसला. मुलाखतीत बोलेल्या अनेक गोष्टींचा विपर्यास केला गेला. या प्रकाराने मला खूप दुःख झालं आहे. इथून पुढे बोलण्याआधी दोन वेळा विचार करेन.' असं साई पल्लवी म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com