सई ताम्हणकरची सामाजिक बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 June 2019

सई एक अभिनेत्री म्हणून उत्तम तर आहेच, पण त्याचबरोबरीने सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच तिचा पुढाकार असतो. सई दरवर्षी तिच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम हाती घेते. यावर्षी तिने तिच्या वाढदिवसानिमित्त शंभर गरजू मुलांना वह्या, पुस्तके अशा शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले.

मराठी चित्रपटसृष्टीमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई एक अभिनेत्री म्हणून उत्तम तर आहेच, पण त्याचबरोबरीने सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच तिचा पुढाकार असतो. सई दरवर्षी तिच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम हाती घेते. यावर्षी तिने तिच्या वाढदिवसानिमित्त शंभर गरजू मुलांना वह्या, पुस्तके अशा शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले.

सई म्हणते, ‘वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशांमधून सामाजिक कार्य करण्याकडे माझा जास्त कल असतो. मुलांना खाऊ आणि उपयोगी वस्तू वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हास्य ऊर्जा देणारं असतं.’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sai tamhankar social commitment