Sai Tamhankar: 'आयफा'सोहळ्यात सईचा मोठा अपमान! म्हणाली.. मला पाहून मिडियाने..

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने एका मुलाखतीत तिला मिळालेल्या वागणूकीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
sai tamhankar talk about how she get ignore at red carpet in iifa award
sai tamhankar talk about how she get ignore at red carpet in iifa awardsakal

sai tamhankar : सई ताम्हणकर हे नाव आता मराठी पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. सईने या आधीही बॉलीवुड मध्ये आपली जादू दाखवली आहे. आता तर तिने हिन्दी चित्रपटांचा धडाकाच लावला आहे. लवकरच ती इम्रान हाशमी सोबत ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात झळकणार आहे. तर सध्या तिच्या 'इंडिया लॉकडाउन'या वेब सिरिजची जोरदार चर्चा आहे. भारतात झालेल्या टाळेबंदीचे आणि त्या दरम्यान घडेलेल्या भयावह घटनांचे चित्रण या करण्यात आले आहे. पण इतकं सगळं करूनही साईला बॉलीवुडमध्ये मनासारखा मान मिळत नसल्याचे दिसत आहे. एका पुरस्कार सोहळ्यात तिचा झालेला अपमान तिने एका मुलाखतीत बोलून दाखवला.

हिंदीतील प्रसिद्ध संवादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सिद्धार्थ कननला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये सईने आपली मन की बात मांडली. 'रेड कार्पेटवर किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये तू गेलीस आणि प्रसारमाध्यमांनी कॅमेरा दुसरीकडेच फिरवला असं कधी झालं आहे का?' असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला.

त्यावर सई म्हणाली, 'हो असं माझ्याबरोबर घडलं आहे. यंदाच्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यामध्येच हा प्रकार घडला. मला पाहून काही माध्यमांनी आणि इनफ्ल्यूएन्सरनी कॅमेरे दुसरीकडे फिरवले. पण त्यांची नावं मी आता सांगू शकत नाही.'

तेव्हा तुझ्याकडे पाहून प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष केलं तेव्हा तुला काय वाटलं असा प्रश्न देखील तिला विचारला गेला. त्यावर ती म्हणाली. 'या गोष्टी मला खूप ऊर्जा देऊन जातात. त्याक्षणी थोडं दुःख होतच आणि ते स्वाभाविकच आहे. पण अशा प्रकारांमुळे मला काम करण्याची अधिक ताकद मिळते. पण अशा अपमानाला आपण आपल्या कामानेच उत्तर देऊ शकतो. जे मी नक्कीच देईन. एक दिवस असा येईल की ही ही लोक माझ्यासाठी येतील आणि मी तिथून निघून जाईन.' हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारेही शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com