इन्स्टाग्रामपासून दूर का आहे सैफ?; म्हणाला,'अकाउंट ओपन करेन पण फक्त तेव्हाच...'.Saif Ali Khan:, Saif Ali Khan not on Instagram | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saif Ali Khan Reveals why he is not on social media;

Saif Ali Khan: इन्स्टाग्रामपासून दूर का आहे सैफ?; म्हणाला,'अकाउंट ओपन करेन पण फक्त तेव्हाच...'

Saif Ali Khan: करिना कपूर खान सोशल मीडियावर खूपच सक्रिय पहायला मिळते पण तिचा पती अभिनेता सैफनं मात्र सोशल मीडियापासून स्वतःला कोसो दूर ठेवलं आहे. पण असं का करतोय सैफ? 'आदिपुरुष' फेम अभिनेता सैफ अली खानने काही दिवसांपूर्वीच याविषयी खुलासा केला होता. सैफनं याचं कारणं सांगत म्हटलेलं की सोशल मीडियाचे खूप फायदे आहेत हे माहिती असूनही मी स्वतःला यापासून लांब ठेवलंय. पण एक गोष्ट आहे ती जर शक्य झाली या प्लॅटफॉर्मवर तर कदाचित मी सोशल मीडियावर माझं स्वतःचं अकाउंट ओपन करू शकतो.(Saif Ali Khan Reveals why he is not on social media)

हेही वाचा: Big Boss Marathi Fame रुचिरा जाधव Exclusive interview

एका मुलाखतीत सैफ अली खाननं सांगितलं की, मी तसा बऱ्यापैकी फोटोजेनिक माणूस आहे,माझ्याकडे माझे खूप फोटो रेकॉर्डमध्ये आहेत. जे आतापर्यंत समोर आलेले नाहीत. मी ते शेयर करू शकतो पण कुणी म्हणतं,''हा नको शेअर करू,तो नको शेअर करू. मला एक मॅनेजर यासाठी पहावा लागेल जो माझं अकाउंट मॅनेज करू शकेल''.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Hemant Dhome: लोक तिकीटं काढतायत आणि शो कॅन्सल होतायत.. हेमंत ढोमे संतापला..

सैफ अली खान पुढे म्हणाला,''लोक मला म्हणतात की मी असं जर माझे फोटो पोस्ट केले नाहीत तर माझ्यावरच मी केलेला अन्याय असेल तो. पण मला वाटतं मी जर हे फोटो पोस्ट केले तर कदाचित माझे फॉलोअर्स लाखोने भले वाढतील पण मग त्यावर येणाऱ्या कमेंट्स कदाचित अनेकदा मला प्रश्न विचारुन भंडावून सोडतील. आणि मला या सगळ्या झंझटमध्ये फसायचं नाही. कारण मी इतरांच्या बाबतीत एखाद्या फोटोवरनं,पोस्टवरनं झालेले वाद पाहत आलोय''.

पण पुढे याबाबतीत स्पष्टिकरण देताना सैफ अली खान म्हणाला, ''फक्त एक अशी गोष्ट आहे जिच्यामुळे कदाचित सोशल मीडियामधला माझा इंट्रेस्ट वाढू शकतो''. तो म्हणाला, ''जर या सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडेफार पैसे कमावता आले तर नक्कीच मी इथे यायचा विचार करू शकतो. ही एकच गोष्ट आहे जिच्या लालसेपोटी मी सोशल मीडियावर अकाउंट ओपन करू शकतो.