तैमुरमुळे सैफ-करिनाला इतक्या कोटींचा फायदा

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

तैमुरच्या फोटोंपासून ते अगदी त्याच्या कपड्यांपर्यंत सर्व काही सोशल मीडियावर ट्रेंड होत असतं. तैमुरमुळे आता करिना आणि सैफला चांगलाच फायदा होणार आहे, जाणून घ्या नक्की तैमुरमुळे या पावर कपलला कसा होतोय फायदा.

मुंबई : बॉलिवूडमध्ये जितकी चर्चा कलाकारांची आहे तेवढीच किंबहूना अधिक चर्चा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टार किड्सची आहे. त्यातच जर सर्वाधिक पसंती असलेला आणि वयाच्या तीसऱ्या वर्षीच फेमस असलेला स्टार किड म्हणजे तैमुर अली खान. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर इंटरनेट सेंसशन आहे. तैमुरची एक झलक टिपण्यासाठी पॅपराझीही धडपड करत असतात. तैमुरच्या फोटोंपासून ते अगदी त्याच्या कपड्यांपर्यंत सर्व काही सोशल मीडियावर ट्रेंड होत असतं. तैमुरमुळे आता करिना आणि सैफला चांगलाच फायदा होणार आहे, जाणून घ्या नक्की तैमुरमुळे या पावर कपलला कसा होतोय फायदा.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#pictureoftheday

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

तैमुर करिनाच्या एका चित्रपटामध्ये लहानशा सिनमध्ये दिसणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती. प्रमोशनसाठी तैमुर दिसणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण, आता चित्र काहीसं उलट झाल्याचं दिसत आहे. तैमुरमुळे बाबा सैफ आणि मॉम करिनाला फायदा झाला आहे. त्याचं झालं असं की, तैमुरच्या लोकप्रियतेमुळे सैफ आणि करिनाला एका ब्रॅंडने अॅड करण्यासाठी ऑफर दिली आहे. त्यासाठी दोघांना चांगले पैसैही मिळणार आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Be Ecstatic and spread the love Because it's Tim tim Birthday  Happy Birthday Tim tim #happy3rdbirthdaytaimur

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

'मिड डे' च्या माहितीनुसार ही डायपर कंपनीची अॅड असणार आहे. तीन तासाच्या शुटिंगसाठी या पावर कपला 1.5 (दीड) कोटींची फिस मिळणार आहे. गेल्या एका वर्षापासून ही कंपनी सैफ आणि करिनाला अप्रोच करत होती. आधी सैफ आणि करिनाने या अॅडसाठी नकार दिला होता पण, काही महिन्यांनंतर पुन्हा अप्रोच केल्यावर त्यांनी होकार दिला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#family #today #familytime

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

सैफ आणि करिनाने तैमुरला कमर्शिअल कॅमेरापासून दूर ठेवलं आहे. सैफने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, अनेक निर्मात्यांनी तैमुरला कॅमेरासमोर आणण्याचा सल्ला दिला होता. सैफ म्हणाला, " बाजार चित्रपटाच्यावेळी निर्मात्यांनी तैमुरला केस रंगवून प्रमोशनसाठी आण्यासाठी सांगितले होते. ‘कालाकांडी’ या चित्रपटाच्यावेळीही तैमुरला प्रमोशनसाठी आणण्याचा आग्रह त्यांनी केला होता.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#familyfirst

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saif and kareena being paid in crores because of taimur