esakal | The Kapil Sharma Show: कपिल शर्मावर सैफ झाला नाराज; कारण..
sakal

बोलून बातमी शोधा

saif ali khan and kapil sharma

सैफने कपिलसमोर त्याची ही नाराजी बोलून दाखवली.

कपिल शर्मावर सैफ झाला नाराज; कारण..

sakal_logo
By
टीम ई सकाळ

'द कपिल शर्मा शो' The Kapil Sharma Show पुन्हा जोमात सुरु झाला असून अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. नुकत्याच सुरु झालेल्या या शोमध्ये सैफ अली खान Saif Ali Khan त्याच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आला होता. यावेळी सैफने 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर आपली निराशा व्यक्त केली. कपिलने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये सैफने सांगितले की शोच्या ग्रीन रूममध्ये त्याचा एकही फोटो नसल्याने तो नाराज आहे.

सैफ, त्याच्या 'भूत पोलीस' या चित्रपटातील सह-कलाकार यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिससह, ग्रीन रूममध्ये कपिलची वाट पाहत होता. तेव्हा सैफच्या लक्षात आले की याआधी शोमध्ये आलेल्या स्टार्सचे अनेक फोटो फ्रेम करून भिंतीवर लावलेली आहेत. जेव्हा कपिल आला तेव्हा सैफ म्हणाला की, तो सेट डिझायनरवर अत्यंत नाराज आहे. कारण ग्रीन रूममध्ये त्याचा एकही फोटो नाही. "मी तुमच्यासोबत १० पेक्षा जास्त शो केले आहेत, पण इथे माझा एकही फोटो नाही. तुमच्याकडे शक्ती कपूरचा यांचाही फोटो आहे, पण माझा नाही”, अशा शब्दांत सैफने नाराजी बोलून दाखवली.

हेही वाचा: 'पुरुषाला प्रश्न विचारले जात नाहीत', का चिडली समंथा?

सैफने कपिलसमोर त्याची नाराजी बोलून दाखवली असली तरी त्याने या शोबाबत स्तुतीदेखील केली. आपल्या कुटुंबीयांसोबत ब्रेक घेतल्यानंतर कपिल शर्मा त्याच्या शोसह पुन्हा जोमाने परतला. आतापर्यंत या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. यामध्ये अक्षय कुमार, अजय देवगण, क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ, रणधीर कपूर आणि करिश्मा कपूर यांचा समावेश आहे. शोच्या पुढील भागात विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रोमोशसाठी येणार आहे.

loading image
go to top