Vikram Vedha: सैफने चालवली खरीखुरी बंदूक, छापेमारी आणि एन्काउंटरही शिकला... Saif Ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saif worked rigorously to play encounter specialist,practice with real gun

Vikram Vedha: सैफने चालवली खरीखुरी बंदूक, छापेमारी आणि एन्काउंटरही शिकला...

Vikram Vedha:सैफ अली खान आणि हृतिक रोशन स्टारर विक्रम वेधाचा उत्कृष्ट ट्रेलर रिलीज झाल्यापासून, या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळत आहे. प्रेक्षकांना हृतिक रोशनचा वेधाचा दमदार अवतार आवडला होता, तर ट्रेलरमध्ये सैफ अली खान विक्रमच्या रूपात सर्वात छान कॉप अवतारातही भाव खाऊन गेला.(Saif worked rigorously to play encounter specialist,practice with real gun)

हेही वाचा: नियाची हॉट कर्वी फिगर...ट्रोलर्स म्हणाले,'हिला बस्स..'

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, सैफ त्याच्या पांढऱ्या टी-शर्टमध्ये एका डॅशिंग पोलिसाच्या अवतारात पडद्यावर येतो, त्याच वेळी तो त्याच्या व्यक्तिरेखेची छाप पाडून जातो. सैफला अशी भूमिका साकारताना पाहणे हे प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राईज असले तरी, या व्यक्तिरेखेसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. यासाठी सैफने खऱ्या बंदुकींचा सराव करण्यापासून ते प्रत्यक्ष बंदुकीच्या गोळीबाराचा आवाज आणि यंत्रणा समजून घेण्यापर्यंत सर्व काही केले जेणेकरून त्याचे पात्र पडद्यावर खरे

हेही वाचा: 'हम साथ साथ है' फेम महेश ठाकूरला 5 करोडचा गंडा, आरोपी मयंक गोयलचं नाव घेत म्हणाला..

सैफने या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजीपूर्वक दखल घेतली आहे आणि स्वीकारली आहे. पोलिस ज्या पद्धतीने बंदुका ठेवतात इथपासून ते गुंडांची वस्ती असलेल्या इमारतींवर छापे टाकण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची त्याने खूप सखोल माहिती करुन घेतली.

हेही वाचा: Big Boss 16: राज कुंद्रा स्पर्धक बनून येणार,फी चा आकडा आणि डिमांड्स वाचून बसेल झटका

दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री म्हणतात, "स्क्रिप्टची मागणी असल्याने, आम्हाला सैफने एन्काउंटर स्पेशालिस्ट वाटावं,तसाच अंदाज त्याचा असावा असं वाटत होतं. आणि त्यानं ते करुन दाखवलं. खरंतर सैफने भूमिकेसाठी केलेले कठोर संशोधन थक्क करणारे आहे. त्यानं खऱ्या बंदूकांची माहिती करून घेत, ते त्या बंदूका चालवण्यापर्यंत सर्वांचे ट्रेनिंग घेतले. सैफने बरेच काही केले आहे. कठोर परिश्रम आणि त्याच्या कामाबद्दलची त्याची आवड ट्रेलर आणि चित्रपटातील त्याच्या देहबोलीतून दिसून येते."

हेही वाचा: KBC 14: विचित्र चाहत्याच्या तावडीत सापडलेले अमिताभ, मग जे घडलं ते बिग बीं कडूनच ऐका

विक्रम वेधा हे गुलशन कुमार, टी-सीरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी फ्रायडे फिल्मवर्क्स आणि जिओ स्टुडिओ आणि YNOT स्टुडिओ प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून भूषण कुमार आणि एस शशिकांत यांनी निर्मिती केली आहे.

हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी जागतिक स्तरावर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Saif Worked Rigorously To Play Encounter Specialistpractice With Real

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..