'बंजारा' लूकमध्ये आर्ची 'सैराट'; व्हायरल फोटोंनी लावलंय याड

टीम ई सकाळ
Saturday, 27 February 2021

बंजारा लूकमधील फोटोशूटचा फोटो रिंकूने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंना तिच्या चाहत्यांनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत.

मुंबई - मराठी चित्रपट सृष्टीमधील सुपर हिट चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. तिच्या अभिनयाचं प्रेक्षक नेहमीच कौतुक करतात. रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावरील  तिच्या प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. वेगवेळ्या लूकमधील फोटोशूटचे फोटो रिंकू सोशल मीडियावर शेअर करते. 

नुकताच बंजारा लूकमधील फोटोशूटचा फोटो रिंकूने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंना तिच्या चाहत्यांनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. बंजारा लूकमध्ये रिंकू खूप सुंदर दिसत आहे. 'नेहमीच स्वत:चे वेगळ्या प्रकारचे सौदर्य निर्माण करा'असे कॅप्शन रिंकूने या फोटोला दिले आहे. 

रिंकूच्या बंजारा लूकमधील फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव झाला आहे. बंजारा ड्रेस मधील या फोटोने नेटकऱ्यांना 'येड लावलं' असे म्हणता येईल. 

मराठी मधील सैराट, मेकअप, कागर या चित्रपटांमधून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. त्यानंतर मनासू मलिगे या कन्नड चित्रपटात रिंकूने काम केले. 

हंडरेड या वेब सिरीजमधून हिंदी चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री लारा दत्तासोबत काम करण्याची संधी रिंकूला मिळाली. लॅाकडाऊनवर आधारित अनपॉजड् या वेब सिरीजमधील रिंकूच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sairat fame archi rinku rajguru banjara look photoshoot viral