Sajid Khan: बिग बॉस 16 मध्ये साजिद खाननं लावली सेटिंग? या सुंदरीला करतोय डेट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sajid Khan

Sajid Khan: बिग बॉस 16 मध्ये साजिद खाननं लावली सेटिंग? या सुंदरीला करतोय डेट...

बिग बॉस 16 मध्ये दिसणारे स्पर्धक आता घराबाहेर चर्चेत आहेत. काहींना चित्रपट तर काहींना मालिकेत काम मिळाले. दरम्यान, असे दोन स्पर्धक आहेत ज्यांच्यामध्ये प्रेमाच्या चर्चा रंगत आहेत.

बिग बॉस 16 मध्ये गौतम विगसोबत रोमान्स करणारी सौंदर्या शर्मा आता दुसऱ्याशी जोडली गेली आहे. साजिद खान आणि सौंदर्या यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत.

अलीकडेच बातमी आली होती की साजिदने सौंदर्याला त्याच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. 4 वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करणारा साजिद लवकरच त्याचा नवीन चित्रपट घेऊन येत आहे, ज्यामध्ये शहनाज गिल मुख्य भूमिकेत आहे. शोमध्येच सौंदर्या आणि गौतमचे ब्रेकअप झाले होते. तसेच साजिद खानसोबत तिचे बाँडिंगही खूप चांगले होते.

साजिद आणि सौंदर्याच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे, ते फक्त दोघांनाच ठाऊक, पण अलीकडेच अब्दु रोजिकच्या पार्टीत सौंदर्या मंडली सोबत खूप फ्रेंडली वागताना दिसली. साजिद खानच्या प्रेमाच्या चर्चा जॅकलिन फर्नांडिससोबतही झाल्या आहेत. साजिदचे गौहर खानसोबतही प्रेमसंबंध होते.

साजिद आणि सौंदर्याच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक डेंटिस्ट-अभिनेत्री सौंदर्या हिला गोल्ड डिगर म्हणत ट्रोल करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, हे जरी खरे असले तरी सौंदर्याला सर्व काही माहीत असताना साजिदला डेट कशी करू शकते.