
Salaar Movie Trailer Prabhas Director Prashant Neel : बाहुबली फेम प्रभासच्या सालार या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. आता त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकरी, चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा वर्षाव झाला आहे. प्रभासची या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका असून तो एका रिबेल अर्थात बंडखोराच्या भूमिकेत आहे.
एका शहरासाठीची आणि राजकीय अस्तित्वासाठीची लढाई यात दिसून येते. सालार - पार्ट १ सिझफायर असं या सिनेमाचं नाव आहे. अर्थातच या सिनेमाचे पुढचे भागही येणार असल्याचं निर्मात्यांनी या ट्रेलरमध्येच सांगितलं आहे. येत्या २२ डिसेंबर रोजी जगभरात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
केजीएफ चॅप्टरचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सालारचे दिग्दर्शन केले असून त्याची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याची टक्कर किंग खानच्या डंकीशी आहे. राजकुमार हिरानी यांच्या डंकीची क्रेझ देखील मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आले आहे. सालारमध्ये प्रभास हा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )
आता व्हायरल झालेल्या ट्रेलरनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्यातील अॅक्शन सीन, ग्राफीक्स हे सारं प्रभावी असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आहेत. हॉलीवूडमधील दिग्गज अॅक्शन डिरेक्टरची मदत घेऊन सालारमधील अॅक्शन सीन शुट करण्यात आले आहे. ज्याची बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. सालार पार्ट १ मधील ते सीन्स देखील हॉलीवूडच्या चित्रपटांशी बरोबरी करणारे आहेत असे म्हटले जात आहे.
दिग्दर्शक प्रशांत नील यांनी हा चित्रपट इंटरनॅशनल लेव्हल स्टाईलमध्ये करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. सालारच्या टीमनं प्रमोशनसाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. प्रभासचा मागील आदिपुरुष चित्रपट याला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्याची चर्चा झाली मात्र प्रभासच्या अभिनयावर प्रेक्षक नाराज झाले होते.
या चित्रपटाविषयी प्रॉडक्शनमधील एकानं दिलेल्या माहितीनुसार, सालारमधील एक सीन शूट करण्यासाठी ७५० हून अधिक वाहनांचा वापर केला गेला आहे. चित्रपटातील साहसदृष्य मोठ्या कौशल्यानं शुट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करणार अशी चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.