सल्लू-पीसीचं ‘होली है’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

‘वक्त’ चित्रपटात पीसीचं अक्कीसोबत ‘लेट्‌स प्ले होली’ गाणं चांगलंच गाजलं. त्यानंतर आता प्रियांका पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर होळी साँग घेऊन येणार आहे. पण पीसी या वेळी चक्क दबंग खानसोबत होळी खेळणार आहे.

सलमानच्या ‘भारत’ चित्रपटात प्रियांका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. भारतमध्ये एक स्पेशल होळी गाणं सलमान-प्रियांकावर चित्रित करण्यात येणार असल्याची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाच्या शूटला १७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. भारतमधील सलमान-प्रियांकाचे हे होळी गाणं तीन दिवस शूट केले जाणार असल्याचे समजत आहे. भारत चित्रपट ‘अॅन ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. सलमान-प्रियांकावर चित्रित करण्यात येणारं हे होळी सणाचं गाणं त्यांच्या चाहत्यांना वेड लावणार एवढं नक्की. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman and priyanka chopra in bharat movie