esakal | ‘नो एन्ट्री’मधून सलमानची एक्‍झिट
sakal

बोलून बातमी शोधा

‘नो एन्ट्री’मधून सलमानची एक्‍झिट

अभिनेता सलमान खानने अनेक चित्रपट बॉलीवूडला दिले. त्यातच त्याचा ‘नो एन्ट्री’ हा चित्रपट खूप गाजला.

‘नो एन्ट्री’मधून सलमानची एक्‍झिट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेता सलमान खानने अनेक चित्रपट बॉलीवूडला दिले. त्यातच त्याचा ‘नो एन्ट्री’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाचा चौदा वर्षांनंतर सिक्‍वेल येणार आहे. यात सलमानसोबत अभिनेता अनिल कपूर, फरदीन खान, अभिनेत्री बिपाशा बासू, ईशा देओल, सेलिना जेटली आणि लारा दत्ता मुख्य भूमिकेत होते.

सिक्वेलमध्येही हे कलाकार असणार आहेत; मात्र या चित्रपटातून सलमानने एक्‍झिट घेतली आहे. याची माहिती चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी दिली. सलमान त्याच्या ‘राधे : इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाच्या चित्रीकरण आणि प्रोमोशनमध्ये व्यस्त असल्याने त्याने या चित्रपटासाठी नकार दिला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता सलमानच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्याची निवड होते हे पाहणं रंजक ठरणार आहे.    

web title : Salman exits From 'No Entry' film series 

loading image
go to top