Salman Khan - Aamir Khan: ईद निमित्ताने सलमान - आमीर एकत्र.. फॅन्सना आली 'अंदाज अपना अपना' ची आठवण

ईद निमित्ताने सलमान खान - आमिर खान एकत्र आले.
 Salman Khan,  Aamir Khan, ramadan eid 2023, andaz apna apna movie
Salman Khan, Aamir Khan, ramadan eid 2023, andaz apna apna movieSAKAL

Salman Khan - Aamir Khan On Eid 2023 News: आज ईद आहे. भारतीयांसाठी हा विशेष दिवस. बॉलिवूडचे अनेक कलाकार उत्साहात ईद साजरी करताना दिसतात. बॉलिवूडचे खानदान ईद च्या निमीत्ताने कायम एकत्र येत असतात. भाईजान सलमान खानचा ईद निमित्ताने किसी का भाई किसी कि जान सिनेमा ईद निमित्ताने रिलीज झालाय. त्यामुळे सलमान खानची यंदाची ईद खास असणार आहे. अशातच ईद निमित्ताने सलमान खान - आमिर खान एकत्र आले.

(Salman Khan - Aamir Khan together on the occasion of Eid.. Fans have a special memory of 'Andaz Apna Apna' movie)

सलमान खानने सोशल मीडियावर आमिर आणि त्याचा फोटो पोस्ट केलाय. फोटोमध्ये सलमानने काळा शर्ट आणि मॅचिंग पॅन्ट घातली होती. आमिरने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या डेनिम्सचा पर्याय निवडला.

दोघांनी एका रुम मध्ये फोटोसाठी ही खास पोज दिलीय. फोटो शेअर करताना सलमानने त्याला कॅप्शन दिले, "चांद मुबारक."

 Salman Khan,  Aamir Khan, ramadan eid 2023, andaz apna apna movie
Ashvini Bhave.. आजही लिंबू कलरची साडी पाहिली तर तुम्हीच आठवता मॅडम..!

या फोटोवर प्रतिक्रिया देताना संगीता बिजलानी यांनीही ‘चांद मुबारक’ अशी कमेंट केली. प्राइम व्हिडीओने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, "आपका प्रेम अमर रहे". सलमानने 1994 मध्ये आलेल्या 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात प्रेम आणि आमिरने अमरची भूमिका साकारली होती.

दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, "एका फ्रेममध्ये दोन दिग्गज." एक चाहता म्हणाला, "अंदाज अपना अपना 2 येतोय का??" आणखी एका युजर्सने लिहिले, "आम्हाला अंदाज अपना अपना 2 हवा आहे."

"अमर-प्रेम पुन्हा एकत्र आले," दुसरा चाहता म्हणाला. "शेवटी प्रेम आणि अमर एकत्र," दुसर्‍या व्यक्तीने टिप्पणी केली.

एकूणच सलमान आमिरच्या फोटोवर फॅन्सना अंदाज अपना अपना सिनेमाची आठवण झाली. या दोघांनी अंदाज अपना अपना चा सिक्वेल घेऊन यावा अशी मागणी होतेय.

 Salman Khan,  Aamir Khan, ramadan eid 2023, andaz apna apna movie
Anushka Pimputkar तू एक राजकन्या.. स्वर्गातली मेनका

१९९४ ला आलेला अंदाज अपना अपना हा कॉमेडी चित्रपट राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला होता.

आमिर आणि सलमानशिवाय या चित्रपटात रवीना टंडन, करिश्मा कपूर, परेश रावल आणि शक्ती कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

या सिनेमातील क्राईम मास्टर गोगो, तेजा, बजाज, रविना, करिश्मा अशा अनेक भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.

दरम्यान आमिरचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला लाल सिंग चड्ढा सिनेमा फ्लॉप झाला. सलमानचा किसी का भाई किसी कि जान सिनेमा नुकताच रिलीज झालाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com