esakal | सलमान आणि आयुषचं ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’: पोस्टर व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

सलमान आणि आयुषचं ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’: पोस्टर व्हायरल

सलमान आणि आयुषचं ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’: पोस्टर व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडमध्ये (bollywood) ज्या अभिनेत्याच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात असा अभिनेता म्हणजे सलमान खान. (salman khan_ त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याचा राधे द मोस्ट वाँटेड भाईजान नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अर्थात त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सलमानच्या मुव्हिजला ज्या प्रमाणात ओपनिंग मिळते तसा त्याच्याबाबत उत्साहही नव्हता. सलमानच्या वडिलांना देखील त्याचा हा चित्रपट फारसा आवडला नसल्याच्या बातम्या यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होता. त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास, तो आता टायगरच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे आणखी तीन महत्वाचे चित्रपट आहेत. मात्र त्यासगळ्यात चर्चा आहे त्याच्या अंतिम द फायनल ट्रुथ (antim the final truth) या चित्रपटाची.

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपासून त्यांच्या या चित्रपटाची चर्चा आहे. गणेश चतुर्थीपूर्वीच सलमाननं आपल्या चाहत्यांना एक वेगळ्या प्रकारचं गिफ्ट दिलं आहे. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या पोस्टरमध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा हे दोन अभिनेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यांच्याकडे पाहून ते युद्धाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. त्या दोघांच्या लूकचं मोठ्या प्रमाणावर कौतूक होत आहे. सलमानच्या अशाप्रकारच्या लूकचं त्याचे चाहते नेहमीच उत्साहानं स्वागत करत असल्याचे पाहायला मिळते. पोस्टरचे डिजाइन लक्षवेधी आहे. त्यात दोन प्रमुख व्यक्तिरेखांचा संघर्ष दिसून येतो.

चित्रपट ‘अंतिम’चे कथानक मुख्यत्वे करून पोलीस आणि वेगवेगळ्या विचारधारांचे गैंगस्टर यांच्या आसपास फिरते. दोन नायक असलेला हा चित्रपट, ‘अंतिम’ पूर्णपणे दोन वेगवेगेळी विश्व आणि विचारधारांच्या दोन नायकांमधील संघर्षाला समोरा-समोर आणते, ज्यातून एक भयकंपित आणि अंगावर काटा आणणारं चित्रण या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच सलमानसोबत दिसणार आहे. सलमानच्या या चित्रपटाची निर्मिती त्यानचं केली असून दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केली आहे.

हेही वाचा: सलमान-कतरिनाने घेतली तुर्कीतल्या मंत्र्यांची भेट

हेही वाचा: सलमान खानमुळे 'या' अभिनेत्रीने बदललं स्वत:चं नाव

loading image
go to top