Bigg Boss 13 : आज होणार ग्रँड प्रीमिअर; सलमानसोबत दिसणार 'ही' अभिनेत्री

टिम ई-सकाळ
रविवार, 29 सप्टेंबर 2019

सुपरस्टार सलमान खान या सीजनमध्ये बिगबॉस शो होस्ट करणार असून, आज ग्रॅन्ड प्रीमिअरमध्ये त्याच्यासोबत माधुरी दीक्षितदेखील दिसणार आहे. दोघे 'हम आपके है कौन'मधील गाण्यावर डान्स करताना दिसणार आहेत.

पुणे : प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा छोट्या पडद्यावरील प्रसिध्द हिंदी 'बिगबॉस' या रिअॅलिटी शोच्या सीजन 13 चा ग्रॅन्ड प्रीमिअर आज होणार आहे. बिगबॉस सीजन 13 बाबत प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता आहे. बिगबॉसचे नवीन घर कसे असणार आहे? यावेळी बिगबॉसमध्ये कोणते कंटेस्टंट असणार ? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रेक्षकांना त्यांच्या या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहे<

सुपरस्टार सलमान खान या सीजनमध्ये बिगबॉस शो होस्ट करणार असून, आज ग्रॅन्ड प्रीमिअरमध्ये त्याच्यासोबत माधुरी दीक्षितदेखील दिसणार आहे. दोघे 'हम आपके है कौन'मधील गाण्यावर डान्स करताना दिसणार आहेत.

हे आहेत बिगबॉस 13 चे कंटेस्टंट

अभिनेता सिध्दार्थ शुक्ला, देवोलिना भटाचार्य, रश्मी देसाई, दलजीत कौर, शिविन नारंग, आरती सिंह पारस छाब्रा हे कंटेस्ट असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. ​आज होणाऱ्या ग्रॅन्ड प्रीमिअरमध्ये त्यांची एंट्री कशी होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यांचा लुकचे काही बिगबॉसने शेअर केले आहेत.

कसे आहे बिगबॉसचे नवीन घर?

फिल्म सिटीमध्ये बिगबॉसच्या नवीन घराचा सेट उभारण्यात आला असून नेहमीप्रमाणे यंदाही हटके थीमवर साकारली आहे. 18500 स्वेअरफुटमध्ये संग्रहालय स्वरुपातील सेट उभारण्यात आला आहे. या घरात 93 कॅमेरे असून 14 स्पर्धक 100 दिवस या घरामध्ये राहणार आहेत.

घरामध्ये विविध रंग वापरले असून, गुलाबी रंगाचा सर्वात जास्त वापर केला आहे. 14 कटेंस्टटसाठी बेडरुमध्ये सोय केली असून, तिघांना एक बेड शेअर करावा लागणार आहे. यावेळी इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करुन घर सजविण्यात आलं आहे.

आज बिगबॉस चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. आज रात्री 9 वाजता ग्रॅन्ड प्रीमिअर पहायला विसरु नका. सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 10. 30 वाजता तुम्हाला बिगबॉस पाहता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman khan And Madhuri dixit will dance today at launch of Bigg Boss Season 13 Grand Premier