सलमान खान बारामतीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

अभिनेता सलमान खान याच्या 'दबंग 3' या चित्रपटाचे शूटिंग सध्या बारामती परिसरात सुरू आहे. यावेळी सलमान खानला पाहण्यासाठी तरुण वर्ग आणि त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

बारामती : अभिनेता सलमान खान याच्या 'दबंग 3' या चित्रपटाचे शूटिंग सध्या बारामती परिसरात सुरू आहे. यावेळी सलमान खानला पाहण्यासाठी तरुण वर्ग आणि त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

सिनेमाची शूटिंग पाहण्यासाठी आलेल्या सलमानच्या चाहत्यांमुळे सुरक्षारक्षक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथं तैनात करण्यात आला आहे. असे असले तरी चाहत्यांचा उत्साह मात्र कणभरही कमी होताना दिसत नाही.

दरम्यान, बॉलिवूडचा दबंग खान आपल्या गावात आल्याची बातमी पसरल्यानंतर आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी तरुण अक्षरश: घरांच्या छतावर, इमारतींवर चढत आहेत. तसंच टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरात आवाज देताना दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman khan in baramati for Dabang3 Shooting