
Salman Khan death threat : सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती मोठा सुगावा लागला आहे. दोन दहशतवाद्यांसोबत एका अल्पवयीन मुलावर सलमान खानला मारण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या संदर्भात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
(Salman Khan death threat: Juvenile among 2 terror accused held; was tasked with 'eliminating' Bollywood star)
सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर कोणीतरी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि अभिनेत्याची सुरक्षा कडक करण्यात आली होती. पण सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठा खुलासा केला आहे. दोन दहशतवाद्यांसोबत अल्पवयीन मुलावर सलमान खानला मारण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठी माहिती मिळाली आहे. खर तर मोहाली येथील पंजाब पोलीस मुख्यालयावर ९ मे रोजी झालेल्या आरपीजी हल्ल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन दहशतवादी आरोपींना अटक केली आहे, ज्यापैकी एक अल्पवयीन आहे. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाला सलमान खानला जीवे मारण्याची काम देण्यात आले होते, असा खुलासा त्यांनी केला.
या अल्पवयीन मुलाशिवाय, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे, ज्याचे नाव अर्शदीप सिंह आहे. हरियाणामध्ये स्फोटके जप्त केल्याप्रकरणी पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी अर्शदीप सिंहला अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि पंजाबमधील सुप्रसिद्ध गुंड जग्गू भगवानपुरिया या दोघांनी एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने सलमान खानच्या हत्येची सुपारी दिली होती. दीपक (सध्या फरार) आणि मोनू डागर (तुरुंगात) यांच्यावर सोपवली होती.
गँगस्टर जग्गू भगवानपुरियावर सिद्धू मुसेवाला हत्येच्या आरोप आहे. हा अल्पवयीन तरुण उत्तर प्रदेशातील फैजाबादचा रहिवासी असून दीपक हरियाणातील सुरखपूर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी या आरोपींना गुजरातमधील जामनगर येथून अटक केली असून त्यांना मदत करणारे स्थानिक नेटवर्कही शोधून काढले आहे. या अल्पवयीन मुलाने पोलिसांकडे केलेल्या चौकशीत खुलासा केला की, लॉरेन्स बिश्नोईने त्याला, दीपक आणि डागरला सलमान खानला मारण्याचे काम सोपवले होते.
सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाणावर का आहे?
राजस्थानच्या जोधपूरमध्ये "हम साथ साथ है" चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी सलमाने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप होता. राजस्थान येथे बिश्नोई समाज आहे. हा बिश्नोई समाज काळ्या हरणाला अत्यंत पवित्र मानतो आणि सलमानवर काळवीट शिकार केल्याचा आरोप झाल्यानंतरच लॉरेन्स बिश्नोईने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर असून त्याला दोनदा ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. सलमान खानला त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसजवळ ठार मारण्याचा कट रचला जात होता, त्यासाठी तिथे रेसही करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.