कोरोना रुग्णांच्या मदतीला धावला 'राधे'; निर्मात्यांची घोषणा

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने(Salman Khan) कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
Radhe poster
Radhe posterinstagram
Updated on
Summary

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने(Salman Khan) कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

मुंबई- देशात कोरोनाचे संकट (Corona Pandemic) वाढत आहे. रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने बऱ्याच रूग्णालयांमध्ये वैद्यकिय सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक कोरोना रूग्णांना बेड, ऑक्सिजन आणि औषध वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी सरकारकडे मदत मागितली आहे. आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने(Salman Khan) कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सलमानचा चित्रपट ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासंबंधीत सलमानने आणि झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजने एक मोठी घोषणा केली आहे. (salman khan film radhe producer donate revenue for covid relief)

सलमानचा ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपटाची कमाई कोरोना संकटात अडकलेल्या सर्व लोकांची मदत करण्यासाठी वापरली जाणार आहे. या चित्रपटांच्या निर्मात्यांनी सांगितले, 'देश सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. कोरोना विरोधी लढाईमध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छित आहे. त्यामुळे आम्ही राधे चित्रपटाची कमाई कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी वापरणार आहोत.'

Radhe poster
सुगंधा मिश्रा झाली भोसलेंची सून; नऊवारी साडीत खुललं नवरीचं सौंदर्य

सलमान खान फिल्म्सच्या एका प्रवक्त्याने सांगितले, 'आम्ही या कामात भाग घेत आहोत या बद्दल मला अभिमान वाटत आहे. आम्हाला आनंद आहे की, कोरोनाच्या या लढाईमध्ये आम्ही आमचे योगदान देऊ शकतो. ' झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज आणि सलमान खान फिल्म्स या दोन्ही कंपन्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबांनासुद्धा मदत देणार असल्याचं म्हटलं आहे. सलमानच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. याआधी सलमानने कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झालेल्या कर्नाटकामधील एका 18 वर्षाच्या मुलाची जबाबदारी स्विकारली होती. तसेच सलमान त्याच्या 'बिइंग ह्यूमन फाउंडेशन' या संस्थेमार्फत नेहमीच सामाजिक कार्य करत असतो.

13 मे ला 'राधे :योर मोस्ट वांटेड भाई' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटांमधील गाण्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सूरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com