पत्रकाराच्या केससंदर्भात सलमानला तुर्तास हायकोर्टाचा दिलासा;वाचा सविस्तर

पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी सलमानला 5 एप्रिल रोजी अंधेरी कोर्टोत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
Salman Khan has approached Bombay High Court against the summons issued to him by Andheri court.
Salman Khan has approached Bombay High Court against the summons issued to him by Andheri court.Google

काय आहे हायकोर्टाचा निर्णय?...

बॉलीवूड अभिनेता सलमान खाननं(Salman Khan) पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणात अंधेरी कोर्टानं(Andheri Court) बजावलेल्या समन्स विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सलमानला अंधेरी कोर्टात ५ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.अंधेरी कोर्टानं या संदर्भात त्याला काही दिवसांपूर्वी समन्स बजावलं होतं. हे समन्स सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाझ शेख यांना २०१९ मध्ये एका पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी बजावलं होतं. तशी तक्रार त्या पत्रकारानं अधेरी डी.एन.नगर पोलिस स्टेशनमध्ये केली होती. मात्र नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आता सलमानला हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. कोर्टानं 5 मे पर्यंत अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर अंधेरी कोर्टातील हजेरीबाबतही सलमानला सूटही देण्यात आली आहे. सलमानला कोर्टात हजेरीची आवश्यकता नाही. असं हायकोर्टानं म्हटलं आहे.

Salman Khan has approached Bombay High Court against the summons issued to him by Andheri court.
बिग बॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश मराठी सिनेमात,'या'अभिनेत्यासोबत दिसणार

काय घडलं होतं नेमकं?

तक्रारदार पत्रकाराच्या म्हणण्याप्रमाणे,''सलमान खाननं त्याचं शूटिंग करत असलेल्या पत्रकाराशी धरपकड केली होती. सलमान मुंबईत रस्त्यावर सायकलिंग करताना हा प्रकार घडला होता. एका मीडिया फोटोग्राफरनं सलमानचे सायकल चालवतानाचे फोटो क्लिक केल्यामुळे सलमान आणि त्याचा अंगरक्षक चिडला,त्यानंतर पत्रकाराशी हुज्जत घालीत फोटोग्राफरचा कॅमेराही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. पत्रकाराला यासंदर्भात सलमानकडून धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारानं अंधेरी डी.एन.नगर पोलिसस्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. आयपीसी सेक्शन ५०४,५०६ अंतर्गत ही तक्रार नोंदवण्यात आली होती''.

Salman Khan has approached Bombay High Court against the summons issued to him by Andheri court.
करिनाच्या गाडीच्या चाकाखाली 'पापाराझी' चा पाय,अभिनेत्री टेन्शनमध्ये आली

अंधेरी कोर्टानं बजावलं होतं समन्स....

कोर्टानं या केसप्रकरणी प्रक्रिया सुरु केली असून त्यासंदर्भात सलमानाला समन्स बजावले आहे. प्रथमदर्शनी पत्रकारानं केलेल्या आरोपात मॅजिस्ट्रेटला तथ्य आढळल्यानंतर केसची प्रक्रिया सुरु होते आणि त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर रहावं लागतं. याच आधारावर अंधेरी कोर्टानं सलमानला ५ एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. सलमान खाननं अंधेरी कोर्टानं बजावलेल्या समन्स विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठापुढे सलमानच्या याचिकेवर सुनावणी होणार होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com