सलमानचा जीव पुन्हा धोक्यात..लॉरेन्स बिश्नोईनं आता जेलमधून दिली धमकी..म्हणाला...lawrence bishnoi warns salman khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman Khan: lawrence bishnoi warns salman khan if he will not apologise to bishnoi community in blackbuck case

Salman Khan: सलमानचा जीव पुन्हा धोक्यात..लॉरेन्स बिश्नोईनं आता जेलमधून दिली धमकी..म्हणाला..

Salman Khan: गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं पंजाब जेलमध्ये एक मुलाखत दिली जी बघता बघता व्हायरल झाली आहे. बरं या मुलाखतीत तो असं काही बोलून गेलाय ज्यामुळे खळबळ उडाली आहे.

लॉरेन्सनं अभिनेता सलमान खानविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे आणि सलमाननं माफी मागावी असं देखील त्यानं म्हटलं आहे.

लॉरेन्सनं बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला ब्लॅकबक प्रकरणात बिश्नोई समाजाची माफी मागायला सांगितली आहे आणि जर तसं केलं नाही तर परिणाम भोगण्यास तयार रहा अशी धमकी देखील दिली आहे.(salman Khan: lawrence bishnoi warns salman khan if he will not apologise to bishnoi community in blackbuck case)

जेलमध्ये दिलेल्या या नव्या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईनं सलमानला आणखी एक मोठी धमकी दिली आहे. एबीपी न्यूजशी संवाद साधताना बिश्नोई म्हणाला की, त्याचा समाज सलमान खानवर नाराज आहे कारण त्यानं आमचा अपमान केला आहे.

तो पुढे म्हणाला,''सलमानच्या विरोधात केस दाखल केली गेली होती,पण त्यानं तेव्हा देखील आमच्या समाजाची माफी मागितली नाही. जर त्यानं आता देखील माफी मागितली नाही तर मग परिणाम भोगायला त्यानं तयार रहावं. आणि जे काय करायचं आहे ते करण्यासाठी मी कोणा दुसऱ्याचा आधार घेणार नाही''.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

त्यानं सलमानला बिश्नोई समाजाची माफी मागण्यासाठी बोलावलं आहे. जर अभिनेत्याला बिश्नोई समाजानं माफ केलं तर या प्रकरणात तो पुढे काही घातपात करणार नाही असं वचनही त्यानं दिलं आहे.

लॉरेन्स म्हणाला,''सलमानला आमच्या समाजाचे जे मंदीर आहे तिथे येऊन माफी मागायला हवी. जर आमचा समाज त्याला माफ करेल तर मी काहीच करणार नाही''.

लॉरेन्स तोच आहे ज्यानं पंजाबी सिंगर आणि कॉंग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमागे आपला हात असल्याचं मान्य केलं होतं. पण सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जे धमकी देणारं पत्र पाठवण्यात आलं होतं त्यात आपला काहीच हात नव्हता हे देखील त्यानं स्पष्ट केलं आहे.

लॉरेन्स म्हणाला-''मुंबई पोलिसांनी यासंबंधी माझी चौकशी केली. पण मी ते पत्र पाठवलं नव्हतं''.

गेल्या जून मध्ये सलमानला एक पत्र मिळालं होतं. ज्यामध्ये म्हटलं गेलं होतं की तो मुसेवालाप्रमाणे सलमानलाही मरेल. धमकी नंतर सलमानला Y+ सुरक्षा दिली गेली होती. आणि बंदूक जवळ बाळगण्याचं लायसन्सही दिलं गेलं आहे. सलमाननं आपल्या कारला पूर्ण बूलेटप्रूफ बनवलं आहे. तसंच,सलमानच्या घराजवळ आणि त्याच्या शूटिंग जवळच्या सुरक्षेतही वाढ केली आहे.