Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान खानचे 'बिल्ली बिल्ली' गाणे रिलीज, शहनाज गिल आणि पलक तिवारीचा दिसला अनोखा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 billi billi song

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान खानचे 'बिल्ली बिल्ली' गाणे रिलीज, शहनाज गिल आणि पलक तिवारीचा दिसला अनोखा अंदाज

सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या 'किसी का भाई किसी जान' या चित्रपटाचे बिल्ली बिल्ली हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे टीझर सलमानने काल त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. आता हे गाणे चाहत्यांसह देखील शेअर केले गेले आहे. हे गाणे सुखबीर यांनी गायले आहे. संगीत देखील सुखबीरचे आहे. गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहे.

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी, बिग बॉसची प्रसिद्धी शहनाझ गिल देखील या गाण्यात दिसत आहेत. भाग्यश्री देखील या गाण्यात दिसत आहे. यामध्ये सलमान खान पूजा हेगडे बरोबर जोरदार ठुमके मारताना दिसला. लोकांना चित्रपटाचे पहिले गाणे आवडले नाही. आता या पंजाबी गाण्यावर लोक काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.

किसी की भाई किसी की जानमध्ये सलमान खान आणि पूजा हेगडेशिवाय व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल आणि बॉक्सर विजेंदर सिंग देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.

साजिद नाडियादवाला याची निर्मिती करत आहेत. याशिवाय हिमेश रेशमिया, रवी बसरूर, देवी श्री प्रसाद, अमाल मलिक आणि पायल देव यांनी संगीत दिले आहे. 21 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.