esakal | दिवाळीत उडणार 'भाईजान' चा बार, सलमान करणार लवकरच घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan

दिवाळीत उडणार 'भाईजान' चा बार, सलमान करणार लवकरच घोषणा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा भाईजान म्हणुन प्रसिध्द (bollywood bhaijan) असणा-या सलमानच्या (salman khan) राधेनं (radhe) बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. आता त्याचे आणखी दोन नवे चित्रपट येणार आहे. त्यापैकी एक दिवाळीत प्रदर्शित होणार असल्य़ाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. गेल्या वर्षभरापासून चाहते सलमानच्या चित्रपटाच्या प्रतिक्षेत होते. मात्र कोरोनामुळे त्यांचा हिरमोड होत होता. सलमाननं गेल्या महिन्यात त्याचा राधे नावाचा चित्रपट प्रदर्शित केला आणि त्याच्या फॅन्सच्या आनंदाला उधाण आल्याचे दिसून आले. (salman khan next film bhaijaan stated to release on diwal will soon)

वास्तविक नेहमीपेक्षा जास्त बिझनेस सलमानच्या (Salman khan) या चित्रपटानं काही केला नाही. त्याचे कारण म्हणजे चित्रपटाची ढिसाळ कथा, आणि अभिनय. यात सलमानच्या अभिनयावरुनही त्याला अनेकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आता सलमान त्याच्या आणखी दोन चित्रपटांची घोषणा करणार आहे. कदाचित जुलैमध्ये तो ही घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याचा भाईजान नावाचा चित्रपट हा दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.

सलमानच्या भारत आणि दबंग 3 नं दमदार यश मिळवले होते. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. यासगळ्या परिस्थितीवर सलमानचे वडिल सलीम खान यांचे असे म्हणणे होते, सलमानची आताची राधे नावाची फिल्म ही काही फार चांगली फिल्म नव्हती. चित्रपट हा एक व्यवसाय आहे. त्यामुळे ती बनवताना सगळ्यांचा विचार करावा लागतो. त्यामागे आर्थिक गणितही होते. हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यावे.

हेही वाचा: Aai Kuthe Kay Karte:संजना गेली मुंबईला ! पाहा व्हिडिओ

आगामी काळात सलमान हा कभी ईद कभी दिवाली चे शुटिंगही सुरु करणार आहे. आता त्या चित्रपटाचे नाव भाईजान ठेवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याची स्टोरी ही साऊथमधील एका चित्रपटावर आधारित आहे.

loading image