esakal | 'राधे' बाबत भाईजानची मोठी घोषणा

बोलून बातमी शोधा

 salman khan radhe your most wanted bhai to release on this eid on multiple platform
'राधे' बाबत भाईजानची मोठी घोषणा
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये कोरोनाचे गंभीर सावट असताना दुसरीकडे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या डोकेदुखीत वाढ झालीय. याचे महत्वाचे कारण म्हणजे कोरोनामुळे अनेक वेब मालिका, चित्रपट यांच्या प्रदर्शनाबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोरोनाचा सामना करताना मनोरंजन क्षेत्रातील समस्यांना कशाप्रकारे दूर करता येईल याचा विचार निर्माते आणि दिग्दर्शक करत आहे. आतापर्यत अनेक चित्रपट जे एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होते ते त्यांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामागील मुख्य कारण कोरोना हे आहे. आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने त्याच्या नव्या चित्रपटाबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

सलमान खाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन असे सांगितले आहे की, त्याचा आगामी बहुचर्चित राधे हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यावेळी तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्यानं यापूर्वी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून भाईजानच्या चाहत्यांना त्याच्या नव्या राधे या चित्रपटाची उत्सुकता आहे. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता सलमाननं आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

राधे द मोस्ट वाँटेड भाई च्या मेगा रिलिजचं प्लॅनिंग सुरु झालं आहे. त्यानिमित्तानं भाईजाननं हा चित्रपट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्धार केला आहे. त्यानं याविषयी दोन महिन्यांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली होती. विशेष म्हणजे सलमाननं थिएटर चालकांसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या काळात सर्वांपुढे संकटे असताना त्यात थिएटर चालकांचे हाल होऊ नयेत यासाठी सलमाननं आपला चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचाही निर्णय घेतला होता.

सलमानचा राधे हा चित्रपट आता 13 मे ला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सघ्याच्या घडीला देशात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता हा चित्रपट काही निवडक थिएटरमध्येच प्रदर्शित होणार आहे. झी 5, झी प्लेक्स याशिवाय देशातील जे प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत त्यावही प्रेक्षकांना सलमानचा राधे पाहता येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा उद्या प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या वतीने त्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आपल्याला देशातील सद्यस्थितीचा विचार करावा लागेल. कोरोनानं सर्वांना मोठ्या चिंतेत टाकले आहे. अशावेळी कोरोनाचा अधिक प्रसार होणार नाही याविषयी सर्वांना जागरुक राहावे लागेल. त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत.

राधे चित्रपटात सलमान बरोबर दिशा पटानी, रणदीप हुडा, जँकी श्रॉफ यांच्याही त्यात प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचा निर्माता म्हणून सलमाननं झी स्टूडिओलाही करारबध्द केले आहे. हा चित्रपट 13 मे ला प्रदर्शित होणार आहे.