लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून सलमान खानच्या घराची रेकी; पंजाब पोलिसांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan Lawrence Bishnoi Latest News

लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून सलमान खानच्या घराची रेकी; पंजाब पोलिसांची माहिती

Salman Khan Lawrence Bishnoi Latest News सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपींनी लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) सूचनेनुसार बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) लक्ष्य करण्यासाठी मुंबईत रेकी केली होती, असे पंजाबचे पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी रविवारी सांगितले. जूनमध्ये सलमान खान आणि वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते, हे विशेष...

हिंदीमध्ये लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सलीम खान आणि मुलगा सलमान खान दोघांचेही लवकरच सिद्धू मुसेवाला सारखे हाल होणार आहे, असे लिहिले होते. ‘मुसेवाला हत्याकांडातील अटक आरोपींपैकी कपिल पंडित याने चौकशीत सचिन बिश्नोई आणि संतोष यादव याने लॉरेन्स बिश्नोईच्या सूचनेनुसार सलमान खानला लक्ष्य करण्यासाठी मुंबईत रेका केली होती’ असे सांगितल्याचे पंजाबच्या डीजीपींनी सांगितले.

सलमान खानला (Salman Khan) लक्ष्य करण्यासाठी संपत नेहरासोबत योजना आखण्यात आली होती. जी आम्हाला ३० मे रोजी कळली. केंद्रीय एजन्सीच्या मदतीने गॅंगस्टर गोल्डी ब्रारच्या विरोधात इंटरपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीस जारी केला आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात एकूण २३ आरोपींना अटक करण्यात आली आहे, असेही डीजीपी यादव यांनी सांगितले.

हेही वाचा: Shweta Tiwari : श्वेता तिवारीने आपल्या मुलीला दिला लग्न न करण्याचा सल्ला

नेपाळमध्ये राहणारा राजिंदर जोकर गोल्डी ब्रारच्या संपर्कात होता. दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होता. तेथून बनावट पासपोर्टवर थायलंडला पळून गेला होता. प्रकरणाचा तपास करण्यासाठी १०५ दिवस लागले. आरोपी लपून बसलेल्या राज्यांमध्ये हरयाणा, राजस्थान आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे, असेही डीजीपींनी सांगितले.

कपिल पंडित आणि राजिंदर जोकर यांची आधीच आरोपी म्हणून नावे होती. पंजाबच्या मानसा कोर्टाने रविवारी सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य शूटर दीपक उर्फ ​​मुंडी आणि दोन साथीदार कपिल पंडित आणि राजिंदर यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांना शनिवारी पश्चिम बंगाल-नेपाळ सीमेजवळ अटक करण्यात आली होती.

हेही वाचा: Jubin Nautiyal : आता जुबिन नौटियालचे ट्विट चर्चेत; शो रद्दवर म्हणाला...

लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) हा गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार आहे, असा दावा पंजाब पोलिसांनी यापूर्वी याचिकेत केला होता. सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाच्या तपासादरम्यान अटक केलेल्या आरोपींची कबुलीजबाब नोंदवण्यात आला होता. ज्यावरून स्पष्टपणे सूचित होते की लॉरेन्स बिश्नोई याने सहआरोपींना सिद्धू मुसेवालाच्या नियोजित हत्येसाठी नियुक्त केले होते, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Salman Khan Recce Mumbai Lawrence Bishnoi Sidhu Moose Wala Murder Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..