Tiger 3 Salman Khan: उत्साही फॅन्सनी 'टायगर'च्या एन्ट्रीला थिएटरमध्ये फोडले फटाके, लोकं घाबरुन पळाले, व्हिडीओ बघा

सलमान खानच्या फॅन्सचा एक व्हिडीओ समोर आलाय. या फॅन्सनी थिएटरमध्येच फटाके फोडून दिवाळी साजरी केलीय
salman khan tiger 3  fans burst firecrackers at 'Tiger' entry in theatres, watch video
salman khan tiger 3 fans burst firecrackers at 'Tiger' entry in theatres, watch videoSAKAL

Tiger 3 Salman Khan: सलमान खानच्या टायगर 3 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. भाईजानचा सिनेमा पाहायला त्याचे फॅन्स थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी करत आहेत. टायगर 3 चे अगदी पहाटेपासुनचे शो भारतात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत.

अशातच सलमान खानच्या टायगर 3 स्क्रीनींगचा एक व्हिडीओ समोर आलाय. यावेळी भाईजानच्या उत्साही फॅन्सनी थिएटरमध्येच फटाके फोडले आहेत. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

salman khan tiger 3  fans burst firecrackers at 'Tiger' entry in theatres, watch video
Tiger 3 Box Office: सलमानच्या टायगरचा दिवाळी धमाका! पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर कमावले 'इतके' कोटी

भाईजानच्या उत्साही फॅन्सनी थिएटरमध्ये फोडले फटाके

सलमान खानच्या उत्साही फॅन्सचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत पाहायला मिळतं, की एका थिएटरमध्ये टायगर 3 चं स्क्रिनींग सुरु आहे. सलमानची टायगरच्या भुमिकेत एन्ट्री होते. आणि अशातच भाईजानचे उत्साही फॅन्स थिएटरमध्ये फटाके फोडतात.

थिएटरमध्ये अचानक फटाक्यांची आतषबाजी सुरु झाल्याने सिनेमा बघायला आलेले लोकं घाबरुन पळत सुटतात. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असुन ज्यांनी फटाके फोडले अशा लोकांवर पोलिस कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफचा चित्रपट टायगर 3 ने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. sacnilk.com वरील अहवालानुसार, टायगर 3 ने भारतात पहिल्या दिवशी एकूण ₹44.5 कोटींची कमाई केली आहे.

त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये टायगर 3 १०० कोटी क्लबमध्ये दाखल होईल अशी दाट शक्यता आहे.

salman khan tiger 3  fans burst firecrackers at 'Tiger' entry in theatres, watch video
Adarsha Shinde: "बाबासाहेब तुम्ही म्हणालात शिका...", दिवाळीच्या दिवशी शिंदेशाहीची नव्या क्षेत्रात एन्ट्री

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आणि मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात शाहरुख खान, हृतिक रोशनचा कॅमिओ देखील आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेला टायगर 3 बॉक्स ऑफीसवर कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडणार अशी दाट शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com