sagar pandey passes away: सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचं निधन; भाईजान भावूक..

Salman Khan body double : सलमान खानने पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली..
Salman Khan's body double Sagar Pandey dies, actor pays emotional tribut
Salman Khan's body double Sagar Pandey dies, actor pays emotional tributsakal
Updated on

Salman Khan Body Double Died: गेले काही दिवस बॉलीवुडमध्ये निधनाचे दुःखद सत्र सुरू असतानाच बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बॉडी डबल सागर पांडे याच्या(Sagar Pandey) निधनाची वार्ता समोर आली आहे. जीममध्ये व्यायाम करत असाताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झालं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. या बातमीने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सलमाननेही याबाबत एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Salman Khan's body double Sagar Pandey dies, actor pays emotional tribut)

भाईजानच्या 'बजरंगी भाईजान', 'प्रेम रतन धन पायो' यांसारख्या अनेक बिग बजेट सिनेमांसाठी सागर पांडेने सलमानचा बॉडीग डबल म्हणून काम केलं आहे. सागर पांडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असायचा. सलमान खानची कार्बन कॉपी म्हणून त्याची ख्याती होती. सागर हा जिममध्ये वर्क आऊट करताना त्याच्या छातीत अचानक वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला जोगेश्वरीमधील बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्यांची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सागर उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील आहेत. सागरने १९९८ मध्ये ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून बॉडी डबल म्हणून करिअरला सुरुवात केली. मुंबईत काम मिळवण्यासाठी त्याने मोठा संघर्ष केला. कोरोनाकाळात सागरला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यावेळी सलमानने त्याला आर्थिक मदत केली होती. त्याच्या निधनानंतर सलमान खानने एक भाऊक पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com