सलमानचं दुबईतलं नवं प्रकरण;महिलेनं रडून घातला गोंधळ Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

सलमानचं दुबईतलं नवं प्रकरण;महिलेनं रडून घातला गोंधळ

सलमान खान(Salman Khan),आयुष शर्मा,सोनाक्षी सिन्हा ,पुजा हेगडे,सई मांजरेकर,मनिष पॉलआणि गुरू रंधावा यांची दुबईतील 'द-बंग' टूर मोठ्या दणक्यात पार पडली. डिसेंबर नंतर दुबई गजबजायला सुरुवात होते ते तिथल्या शॉपिंग फेस्टिवल्स,दुबई एक्स्पोमुळे. त्याच काळात बॉलीवूडचे हे सितारे तिकडं 'द-ंबंग' टूर घेऊन गेले होते. ही टूर म्हणजे चाहत्यांसाठी मोठी मेजवानीच म्हणायला हवी. त्यावेळी हा 'द-बंग' शो पहायला चाहत्यांची मोठी झुंबड उडालेली पहायला मिळाली. हो शो जितका लक्षात राहिला,तितकाचा हा शो पाहायला आलेली सलमानची एक चाहती आपली छाप सोडून गेली ते एका वेगळ्याच कारणाने.

ती अक्षरशः सलमानला स्टेजवर नाचताना पाहिल्यावर ढसाढसा रडू लागली. ती नुसती त्याला पाहून ओरडत होती आणि रडत होती. ती म्हणाली,'मी इथे फक्त सलमान खानसाठी आली आहे'. सध्या सलमानच्या त्या चाहतीचा त्याला पाहून रडतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. सलमानच्याच एका चाहत्यानं तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या व्हिडीओत आपण पाहू शकाल की,एक महिला स्टेजच्या जवळ उभी आहे आणि जोरजारात रडतेय. तिच्या सोबत असलेली एक दुसरी महिला तिला सांभाळायचा प्रयत्न करताना दिसतेय. पण त्या रडणाऱ्या सलमानच्या चाहतीला मात्र सलमानला भेटण्याचा जणू ध्यासच लागला आहे असं दिसतंय.

हेही वाचा: जावेद अख्तर बदनामी प्रकरण कंगनाला भलतंच भोवतंय;वाचा सविस्तर

'द-बंग' शो(Da-bangg Tour) चा होस्ट मनिष पॉलच्या नजरेला ही गोष्ट दिसली अन् त्यानं तिथे उपस्थित एका सिक्युरिटी ऑफिसरला तिला सहाय्य करण्यास सांगितलं. मनिष तिला म्हणाला,''मी तुझी भेट सलमान खानसोबत करुन देईन''. आणि ती बेशुद्ध वगैरे पडेल या भीतीने मनिषने जवळच उभ्या असलेल्या सिक्युरिटी ऑफिसरला म्हटलं,''भाई ध्यान दे कही बेहोश ना हो जाए''. सलमानची या शो मधील एन्ट्री एकदम ग्रॅन्ड होती. या शो मध्ये सलमाननं त्याच्या अनेक हीट गाण्यांवर परफॉर्मन्स दिला. या शो मध्ये सलमानसोबत अनेक सेलिब्रिटींनी छान-छान परफॉर्मन्स दिले. त्यावेळी आपल्या आवडत्या स्टारला स्टेजवर डान्स करताना पाहून चाहत्यांचा चाललेला जल्लोष मंत्रमुग्ध करणारा होता.

Web Title: Salman Khans Fan Cries Screams For Him At Da Bangg Show In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top