सलमानच्या वकिलाला लॉरेन्स बिश्नोई गॅंगची धमकी.. म्हणाले, मुसेवाला सारखं.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan's lawyer Hastimal Saraswat gets death threat from Lawrence Bishnoi gang

सलमान खानच्या वकिलाला बिश्नोई गॅंगची धमकी.. म्हणाले, मुसेवाला सारखं..

salman khan lawyer : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोई गॅंगची मोठी दहशत माजली आहे. बॉलीवुड मधील कलाकारांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे सध्या तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवुड अभिनेता सलमान खानलाही (salman) लॉरेन्स बिश्नोई गॅंगने धमकी दिली होती. या संदर्भात मुंबई गुन्हे शाखेची कारवाई सुरू असतानाच याच गॅंगच्या एका गुंडाने सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. Salman Khan's lawyer Hastimal Saraswat gets death threat from Lawrence Bishnoi gang

अभिनेता सलमान खान याचे वकील हस्तीमल सारस्वत यांनाही आता लॉरेन्स बिश्नोई गॅंगची धमकी मिळाली आहे. हस्तीमल यांना पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. 'तुम्हाला सिद्धू मुसेवाला सारखेच 'हाल करून मारू' असे या पत्रात लिहिले आहे. हस्तीमल हे जोधपुर येथे राहतात. जोधपुर येथील ओल्ड हायकोर्ट मधील जुबली चेंबर जवळ असलेल्या कचरा कुंडीत हे पत्र सापडले आहे. पत्रामद्धे गॅंग चा उल्लेख असून त्याच्या गुंडांनी हे संकेत दिले आहेत. (salman khan advocate hastimal saraswat threatened )

'या पत्रामध्ये सलमानच्या पात्राप्रमाणेच जीबी आणि एलबी असे दोन उल्लेख करण्यात आले आहेत. जीबी म्हणजे गोल्डी ब्रार आणि एलबी म्हणजेच लॉरेन्स बिश्नोई. सलमानची बाजू घेणाऱ्यांना सोडणार नाही. सलमानचा मित्र तो आमचा शत्रू, असेही यात म्हंटले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. हस्तीमल यांची सुरक्षा वाढवली असून काही खासगी वेशातील पोलीसही त्यांच्या सेवेत तैनात करण्यात आले आहेत. सलमान खान चे वडील सलीम खान यांनाही अशाच आशयाचे पत्र दिले होते.

हस्तीमल यांना धमकी का..

1998 मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचे चित्रीकरण जोधपूर येथे करण्यात आले होते. यावेळी सलमानने हरणाची शिकार केली होती. त्यावेळी सलमान वर तीन गुन्हे नोंदवण्यात आले होते. यावेळी सलमानच्या बाजूने हस्तीमल सारस्वत हे वकील केस लढवत होते. विशेष म्हणजे हस्तीमल यांनी च सलमानला या प्रकरणातून बाहेर पडण्यास सहाय्य केले होते. त्यामुळे सलमान पाठोपाठ आता त्याचे वकील लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या निशाण्यावर आहेत असे बोलले जात आहे.

Web Title: Salman Khans Lawyer Hastimal Saraswat Gets Death Threat From Lawrence Bishnoi Gang

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..