समंथाच्या नादाला लागला अन् तोंडावर पडला...Samantha Ruth Prabhu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha Ruth Prabhu And Her Stylist Preetham Jukalker

समंथाच्या नादाला लागला अन् तोंडावर पडला...

समंथा (Samantha Ruth Prabhu) सध्या आपल्या फीटनेसवर जास्तच लक्ष केंद्रित करतेय असं दिसतंय. 'पुष्पा' या अल्लू अर्जूनच्या सुपरहीट सिनेमातील तिचा आयटम सॉंगमधील हॉट अॅन्ड बोल्ड लूक चाहत्यांना भलताच घायाळ करून गेला. 'फॅमिली मॅन 2' मधील खलनायिका साकारण्यासाठी तर तिनं आपल्या फीटनेसवर घेतलेली मेहनत सर्वांनी पाहिलीच आहे. नागाचैतन्य पासून फारकत घेतल्यानंतर तर अनेकांनी तिच्या बोल्डनेसलाच घटस्फोटाचं कारण बनवलं होतं. पण तिनं सगळ्यांची तोंडं आपल्या कडक उत्तरानं बंद केली होती. तिचं नाव तिचा स्टायलिस्ट प्रीथम जुकलकर याच्यासोबतही जोडले गेले होते. पण त्यावरही स्वतः प्रीथमने उत्तर देऊन अफवा पसरवणा-यांना गप्प केलं होतं. पण आता याच प्रीथमवर समंथामुळे तोंडावर पडण्याची पाळी आली. काय झालं असं नेमकं?

समंथाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती अवघड पद्धतीच्या स्कॉट्स जम्प मारताना दिसतेय.. एकतर स्कॉट मारणं तसंही कठीण पण गुडघ्यावर पाय टेकून पुन्हा जम्प मारून स्कॉट मारायच्या म्हणजे कर्मकठीण काम. पण समंथाने तिच्या ट्रेनरने दिलेलं हे स्कॉट जम्प मारण्याचं चॅलेन्ज पूर्ण केलं आणि आपल्या स्टाफसोबत चाहत्यांनाही ते चॅलेंज दिलं. तिचा खास मित्र आणि स्टायलिस्ट प्रीथमने हे चॅलेंज स्विकारलं खरं पण जम्प मारताना मात्र तो तोंडावर पडला. समंथाचं चॅलेंज स्विकारायला गेला अन् त्याच्यावर ही वेळ आली. आता समंथानं हे चॅलेंज तिच्या फॅन्सनाही दिलंय पण आता प्रीथमची झालेली अवघड अवस्था पाहून कोण कोण हे चॅलेंज स्विकारणार यावर मात्र प्रश्नचिन्हच आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top