
घटस्फोटानंतर समंथाने खरेदी केलं नागा चैतन्यचं घर..
samantha ruth prabhu and naga chaitanya : चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य या लोकप्रिय जोडीच्या घटस्फोटाने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ माजली होती. गेल्यावर्षी या दोघांनीही समाज माध्यमांवर घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. त्या बातमीने चाहते नाराज झाले होते. या घटस्फोटानंतर दोघांनीही माध्यमांना उत्तर देणे अनेकदा टाळले आहे. आता या दोघांबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. समंथाने आपल्या नवऱ्याचे म्हणजे नागा चैतन्यचे हैदराबादमधील घर विकत घेतले आहे.
(Samantha Ruth Prabhu buys house where she used to live with Naga Chaitanya in hyderabad)
समंथा आणि नागा चैतन्य लग्नानंतर ज्या घरात राहत होते ते हैद्राबादमधील घर तिनं विकत घेतलं आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, समंथा आणि नागा चैतन्य यांनी लग्नानंतर त्यांच्या आयुष्यातील खास क्षण ज्या घरात घालवले ते घर समंथानं विकत घेतलं आहे. तिच्या आयुष्यात ते घर फार महत्त्वाचं आहे. हैद्राबादमधील त्या घराच्या मालकानं याबाबत खुलासा करत म्हटलं आहे की, समंथा आणि नागा यांनी आपलं नात तोडलं तेव्हा त्यांनी हे घर विकून टाकलं होतं. मात्र घटस्फोटानंतर समंथा पुन्हा हे घर खरेदी करण्यासाठी आली आणि तिनं हे घर नव्यानं खरेदी केलं आहे. सध्या ती तिच्या आईबरोबर या घरात राहते,' असंही घरमालकानं सांगितलं आहे.
समंथा रुथ प्रभू काही दिवसांआधीच करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात सहभागी झाली होती. तेव्हा तिनं नागा चेतन्यबरोबर झालेल्या घटस्फोटाविषयी भाष्य केलं होतं. त्याचप्रमाणे तिनं तिच्या अभिनय करिअरविषयी माहिती दिली. ती म्हणाली, अभिनय क्षेत्रात येण्याचं माझं कोणतंच प्लानिंग नव्हतं कारण मला खूप अभ्यास करायचा होता. या शिवाय घटस्फोटानंतर एकमेकांविषयी मनात हार्ड फिलिंग आहेत. आम्ही एकमेकांच्या समोर आलो तर धारधार वस्तू लपवाव्या लागतील असंही ती म्हणाली होती.
Web Title: Samantha Ruth Prabhu Buys House Where She Used To Live With Naga Chaitanya In Hyderabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..