Yashoda : समंथा प्रभूच्या 'यशोदा'चे टीझर आज होणार प्रदर्शित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha's Yashoda Movie Teaser

Yashoda : समंथा प्रभूच्या 'यशोदा'चे टीझर आज होणार प्रदर्शित

Samantha Ruth Prabhu Movie Yashoda Teaser : समंथा प्रभूची जबरदस्त फॅन फॉलोइंग असून आता हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकही तिला पसंत करू लागले आहेत. पुष्पाचे जबरदस्त गाणे 'ऊ अंतवा'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर आणि 'द फॅमिली मॅन' या गाजलेल्या शोमधील उल्लेखनीय कामगिरीनंतर केवळ आपल्या सौंदर्यानेच नव्हे तर दक्षिणेतून हिंदी इंडस्ट्रीतही अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Prabhu) आता हिंदीमध्ये ती 'यशोदा' चित्रपटातून पहिल्यांदाच चित्रपटगृहात दिसणार आहे.

हेही वाचा: 'लालसिंग चड्ढा' कवडीमोलात विकत घेतलं नेटफ्लिक्सनं, किंमत ऐकून रडवेल आमिर

आज रात्री टीझर रिलीज होणार

यशोदा हा सामंथाचा बॉलीवूडमधील पदार्पण नाही, तर हिंदीत डब केल्यानंतर प्रदर्शित होणारा दोन भाषांचा चित्रपट आहे, अशा प्रकारे देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा तिचा पहिला हिंदी भाषेतील चित्रपट ठरणार आहे.

तुम्हाला थ्रिलर्सच्या दुनियेत घेऊन जाणारा, समंथाच्या यशोदाचा टीझर या शुक्रवारी, ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. संध्याकाळी ५.४९ वाजता हा टीझर प्रदर्शित होणार आहे. हरी आणि हरीश या दिग्दर्शक जोडीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती शिवलेंका कृष्णा प्रसाद यांनी केली आहे. (Entertainment News)

हेही वाचा: तोकडे कपडे घालून गणपती दर्शनाला गेलेल्या गायिकेची फजिती; मंडळाने रोखलं अन्..

समंथा अॅक्शन करताना दिसणार

नव्या युगातील कथानकात लेखक-समर्थित भूमिका साकारणारी, समांथा अगदी वेगळ्या लूकमध्ये एज-ऑफ-द-सीट अॅक्शन-बॅक्ड यशोदामध्ये दिसण्यासाठी सज्ज आहे. समंथाची भूमिका असलेला हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा एकूण ५ भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी कथेबद्दल जास्त खुलासा केला नाही.

Web Title: Samantha Ruth Prabhu Movie Yashoda Teaser Release Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..