अश्‍शी आहे मेहेक 

संकलन -भक्ती परब  
बुधवार, 3 मे 2017

समीक्षा जयस्वाल म्हणजेच दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या झी टीव्हीवरील "जिंदगी की मेहेक' या मालिकेतील आपली सर्वांची लाडकी मेहेक शर्मा. ती मेहेक या नावानेच सगळीकडे ओळखली जातेय. त्यांची मेहेक शर्मा आणि शौर्य खन्ना ही जोडी छोट्या पडद्यावरील अनेकांची आवडती जोडी आहे. ही मालिका खाद्यसंस्कृतीची आवड असलेल्या गृहिणींसाठीही खास ठरतेय. त्यामुळे आपल्या घरात मेहेकसारखी कुणीतरी असावी, असं प्रेक्षकांना वाटतं. कारण प्रेक्षकांच्या भावना मालिकेतील मेहेकशी मनापासून जोडल्या गेलेल्या आहेत.

याचा प्रत्यय समीक्षा आणि तिचा सहकलाकार करन व्होरा यांना नुकताच आला. मालिकेतील एका महत्त्वाच्या भागाचे चित्रीकरण करण्यासाठी ते एका दर्ग्यावर गेले होते. त्या वेळी त्यांना पाहायला चाहत्यांनी एवढी गर्दी केली की त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले. आणि शूटिंग दोन तास बंद करावं लागलं. अश्‍शा या लोकप्रिय जोडीतील मेहेक म्हणजेच समीक्षा खऱ्या आयुष्यातही तश्‍शी आहे का जशी मालिकेत आहे, तर बिलकूल नाही. समीक्षा खूपच वेगळी आहे. मालिकेत अतिशय आज्ञाधारक, खवय्यी, जेवण बनवण्याची आवड असणारी मेहेक खऱ्या आयुष्यात एकदम विरुद्ध स्वभावाची आहे. समीक्षाची मुख्य भूमिका असलेली ही पहिलीच मालिका. शेफ बनण्याची आवड जोपासणाऱ्या मुलीचं पात्र तिने उत्तमरीत्या साकार केलं आहे; पण तिची ही अभिनयाची आवड तिला पालकांना पटवून द्यावी लागली.

तेव्हा तिच्या पालकांनी तिला इंदोर सोडून मुंबईला जायची परवानगी दिली. मालिकेत भारतीय पोशाखात (पारंपरिक पोशाख, पंजाबी ड्रेसेस, साडी) दिसणाऱ्या समीक्षाला खरंतर असे कपडे घालायला आवडत नाही. शूटव्यतिरिक्त ती वेस्टर्न कपड्यांमध्येच दिसते. तिचा शांत स्वभाव फक्त मालिकेपुरता आहे. प्रत्यक्षात ती खूप बडबडी आहे. आणि हो! ती मालिकेत उत्कृष्ट स्वयपांक करत असते; पण तिला स्वतःला काही तशी आवड नाही आणि स्वयंपाक करताही येत नाही. मालिकेत दिल्लीची पार्श्‍वभूमी असल्यामुळे तिने मालिका सुरू होण्याआधी 15 दिवस स्कूटरवरून दिल्लीमध्ये चांदनी चौक ते इंडिया गेट अशा काही प्रसिद्ध ठिकाणांची भटकंती केली होती.

कारण दिल्ली शहर तिच्यासाठी नवं होतं ते समजून घेण्यासाठी तिने हा वेळ दिला होता. समीक्षा तिच्या दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफी आणि कधी कधी "लेमन टी'ने करते. दिवसभरात तिला ताज्या फळांचा रस प्यायला खूप आवडतं. मालिकेत तिचा लग्नसोहळा शूट करायचा होता तेव्हा तिने तर नऊ किलो वजन कमी केलं होतं. जिंदगी की मेहेक या मालिकेत भूमिका करण्याआधी समीक्षाने काही जाहिरातींमध्ये काम केलंय. तसंच ती यश अजमेरा यांनी दिग्दर्शित केलेल्या पहली दफा या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती; पण समीक्षाला खरी ओळख मिळवून दिली ती मेहेक या पात्रानेच. नुकत्याच तिच्या मालिकेने 150 भागांचा टप्पा पार केलाय. या मालिकेला आणि मेहेकच्या रूपातील समीक्षाला चाहत्यांचं प्रेम असंच मिळत राहो... 
 
Web Title: samiksha jaiswal mehek