Sania Mirza Republic Day Post
Sania Mirza Republic Day Postesakal

Sania Mirza Republic Day Post : 'मी आपल्या देशाची नेहमीच...', प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सानियाची खास पोस्ट!

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा ही नेहमीच तिच्या खास स्टाईल आणि पोस्टमुळे चर्चेत असते.

Sania Mirza Republic Day 2024 Special Post : भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा ही नेहमीच तिच्या खास स्टाईल आणि पोस्टमुळे चर्चेत असते. सध्या तिच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सानियाचा घटस्फोट झाला असून तिच्या पतीनं पाकिस्तानच्या शोएब मलिकनं सना जावेद सोबत तिसरं लग्न केलं आहे.

या सगळ्यात सानिया ही चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर कित्येकांनी सानियाला सपोर्ट केलं आहे. सध्या सानियाच्या आयुष्यात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यात सानियानं इंस्टावर शेयर केलेली पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे. सानियानं केलेल्या त्या पोस्ट चाहत्यांच्या, नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. त्यात एका पोस्टमध्ये सानियानं तिचा एक फोटो पोस्ट करत त्याला रिफ्लेक्ट असं म्हटलं आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये सानियानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पोस्ट शेयर केली आहे. त्यात तिनं भारताप्रती नेहमीच आदर आणि आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यात नेहमीच अग्रेसर राहणार...असे सानियानं तिच्या त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी सानियाला वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. यात चाहत्यांनी सानियाप्रती सहानुभूती दर्शवली आहे.

गेल्या वर्षापासून सानियाच्या वैवाहिक आयुष्यातील वादळाविषयी बोललं जात होतं. पहिल्यांदा अनेकांना त्या बातम्या अफवा असल्याच्या वाटल्या होत्या. तसेच हे दोन्ही सेलिब्रेटी एका रियॅलिटी शो च्या निमित्तानं हा स्टंट करत असल्याचेही सांगितले जात होते. अशातच काही दिवसांपूर्वी सानियाचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. तिच्या पतीनं पाकिस्तानच्या प्रसिद्ध क्रिकेटपटू शोएब मलिकनं तिसरं लग्न केलं आहे.

शोएब प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आणि सेलिब्रेटी सना जावेद सोबत संसार थाटला आहे. त्यानं त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेयर केले होते. त्यावर त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावल्याचे दिसून आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com