व्हिडिओ: संजय दत्तचा नवा लूक, म्हणाला 'मी कॅन्सरला हरवेन'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 15 October 2020

चाहत्यांसाठी आता एक दिलासादायक गोष्ट म्हणजे सोशल मिडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये त्याच्या नवा लूक दिसून येतोय.

मुंबई- संजय दत्तच्या कुटुंबियांसाठी, बॉलीवूडसाठी आणि संजू बाबाच्या चाहत्यांसाठी सगळ्यात मोठा धक्का होता जेव्हा ऑगस्टमध्ये त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याची बातमी समोर आली. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तचा हॉस्पिटलमधील एक फोटो व्हायरल झाला होता त्यात तो खूप अशक्त दिसत होता. त्याच्या या फोटोमुळे चाहते आणखीनंच चिंतेत दिसून आले होते. मात्र त्याच्या चाहत्यांसाठी आता एक दिलासादायक गोष्ट म्हणजे सोशल मिडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये त्याच्या नवा लूक दिसून येतोय.

हे ही वाचा: कंगना रनौतला होणार अटक?

सध्या संजय दत्तचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये त्याने लूक चेंज म्हणून हेअर कट केला आहे. हेअर कट करुन झाल्यावर तो कॅमेराकडे बघत सांगतोय मी कॅन्सरला हरवेन. हा व्हिडिओ प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमने पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये संजू बाबाने केवळ त्याच्या आजाराविषयीच सांगितलं नाहीये तर त्याने त्याचा आगामी सिनेमा केजीएफबद्दलही एक मोठी बातमी चाहत्यांना दिली आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आलिमने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे आणि लिहिलंय, 'दयाळु स्वभाव असलेल्या आमचा लाडका रॉकस्टार संजय दत्त एचए सलून मध्ये आहे.'

संजय दत्त या व्हिडिओमध्ये सांगतोय 'हाय मी संजय दत्त. सलूनमध्ये पुन्हा एकदा येऊन आनंद झाला. मी हेअर कट केला आहे. जर तुम्ही बघु शकत असाल तर मी सांगू इच्छितोकी माझ्या आयुष्यात एका नवीन आजाराने एंट्री केलीये मात्र मी त्याला हरवेन. मी या कॅन्सरच्या आजारातुन लवकर बाहेर पडेन.' या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या आगामी 'केजीएफ चॅप्टर २' विषयी सांगितलं. तो म्हणतोय, 'या सिनेमासाठी मी दाढी वाढवत आहे. तसंच या सिनेमाचं शूट नोव्हेंबरध्ये सुरु होणार आहे.' या सिनेमात तो मुख्य विलन अधीराच्या भूमिकेत आहे.      

sanjay dutt changed his look says i will beat cancer video viral  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay dutt changed his look says i will beat cancer video viral