Panipat : संजूबाबाचा 'अहमद शाह अब्दाली' बघितला का?

टीम ईसकाळ
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

संजय दत्त याने आज (ता. 4) पानिपतमधील त्याचा अहमद शाह अब्दालीचा फर्स्ट लूक शेअर केलाय. पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व मराठ्यांमध्ये झाली होती. भारदस्त रूपातला संजय दत्त हा अहमद शाह अब्दालीच्या रूपात शोभून दिसतोय. 

प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानिपत' या बहुचर्चित चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच लॉन्च झाले. तर अभिनेता संजय दत्त याने आज (ता. 4) पानिपतमधील त्याचा अहमद शाह अब्दालीचा फर्स्ट लूक शेअर केलाय. पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व मराठ्यांमध्ये झाली होती. भारदस्त रूपातला संजय दत्त हा अहमद शाह अब्दालीच्या रूपात शोभून दिसतोय. 

जिरेटोप, चिलखत, सूरमा घातलेली करारी नजर, चेहऱ्यावरचे उग्र भाव व मागे अब्दालीच्या साम्राज्याचा ध्वज असे हे पोस्टर आहे. यासह संजयने या पोस्टरला 'अहमद शाह अब्दाली : जिथे सावली पडेल तिथे शत्रूचा खात्मा होईल...' असे कॅप्शन दिले आहे. ट्विट केल्याच्या काही वेळातच हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

'पानिपतची तिसरी लढाई'
पानिपतची तिसरी लढाई ही मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. 14 जानेवारी 1761 ला हरियानातील पानिपत येथे ही लढाई झाली होती. सदाशिवराव पेशवे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी ही लढाई लढली होती. या लढाईत अहमद शाह अब्दालीच्या सैन्याने मराठा सैन्याचा पराभव केला होती.  

1 नोव्हेंबरला पानिपत या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले. संजय दत्तसह या चित्रपटात अर्जून कपूर, क्रिती सेनन, झीनत अमान, मोहनीश बेहेल हे कलाकार दिसतील. ऐतिहासिक चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आशुतोष गावारीकर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष आता पानिपतकडे लागले आहे. उद्या (ता. 5) या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होईल. तर 6 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Dutt Shares his first look of Ahmad Shah Abdali from Panipat