Sanjay Leela Bhansali Movie : संजय लीला भन्साळींचा 'तो' मास्टरपीस आता 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित!

बॉलीवूडमधील 'ऑल टाईम क्लासिक' मध्ये भन्साळींच्या त्या चित्रपटाचा समावेश होतोच.
Sanjay Leela Bhansali Movie On OTT
Sanjay Leela Bhansali Movie On OTTesakal

Sanjay Leela Bhansali Movie On OTT : बॉलीवूडमधील ऑल टाईम क्लासिक म्हणून ज्या चित्रपटांचे नाव घेतले जाते त्यात संजय लीला भन्साळींच्या त्या चित्रपटाचा आवर्जून समावेश होतो. सावरिया, रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्ममावत, देवदास सारख्या वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या भन्साळी यांनी चाहत्यांना आता गुड न्यूज दिली आहे.

महानायक बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक खास पोस्ट शेयर केली होती. त्यावेळी त्यांनी नेटफ्लिक्सवरील ब्लॅक चित्रपटाचा ट्रेलरही पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी लिहिले आहे की, या चित्रपटाला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आम्ही नेटफ्लिक्सवरुन त्याच्या प्रदर्शनाचा आनंद साजरा करत आहोत.

देबरात आणि मिशेल यांचा तो प्रवास खूपच प्रेरणादायी असा होता. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. आम्हाला आशआ आहे की, हा प्रवास तुम्हालाही खूप काही सांगून जाईल, प्रेरणा देईल. अशा शब्दांत बिग बी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी यांच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती.त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यातील कलाकारांचा अभिनय, संवाद, संगीत, छायांकन हे सारं प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. त्याचे कौतुक झाले होते. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. त्याचे दुसरे कारण त्याला झालेली १९ वर्षे...

भन्साळी यांच्या त्या चित्रपटानं प्रेक्षकांची तुफान लोकप्रियता मिळवली होती. त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा होता. केवळ प्रेक्षक नव्हे तर समीक्षक, अभ्यासकांनी देखील भन्साळी यांचे कौतुक केले होते. आता या चित्रपटाला १९ वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्तानं नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचे चाहत्यांनी स्वागत केले आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांना भन्साळी यांच्या ब्लॅक चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार होता. तो त्यांचा दुसरा पुरस्कार होता. या चित्रपटानं हिंदी श्रेणीमध्ये बेस्ट फिचर फिल्म आणि सब्यसाची मुखर्जी यांना ड्रेस डिझाईनसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com