
Sanjay Leela Bhansali: संजय लीला भन्साळी मोठा पडदा सोडून ओटीटी का गाठलं? कारण सांगतांना म्हणे...
संजय लीला भन्साळी हे त्यांच्या जादुई जगासाठी आणि भव्य सेटसाठी ओळखले जातात. नुकताच त्यांच्या पुढच्या प्रोजेक्ट 'हिरामंडी'चा टीझर रिलीज झाला आहे. संजय लीला भन्साळीच्या 'हिरामंडी' च्या टीझरने चाहत्यांना मुख्य अभिनेत्रीच्या राजेशाही आणि जबरदस्त लुकमुळे आश्चर्यचकित केले.
वेब शोमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शर्मीन सहगल आणि संजीदा शेख यांच्या भूमिका आहेत.
टीझर लॉन्च इव्हेंटमध्ये, दिग्दर्शकाने या प्रोजेक्टसह मोठ्या स्क्रीनवरून ओटीटीमध्ये झालेल्या त्यांच्या संक्रमणाबद्दल सांगितले. या बदलाविषयी बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले, "मी मोठे चित्रपट बनवतो आणि ते माझ्याकडे स्वाभाविकपणे येते".
"पण जेव्हा मी ओटीटीमध्ये आलो तेव्हा मी काहीतरी मोठे केले, हा माझा आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे मला डिजिटल माध्यमाशी जुळवून घेण्याची गरज नव्हती, हे चित्रपट पाहण्यासारखे असेल. म्हणूनच ओटीटीसाठी कोणतेही बंधन किंवा काही वेगळे करण्याचा प्रयत्न नाही".

"मी त्यासाठी 8 भाग बनवले आहेत, आणि त्याची खूप मागणी आहे, मी सतत स्क्रिप्टवर काम करत आहे. तुम्हाला चित्रपट करण्यापेक्षा जास्त तास घालवावे लागते पण आम्ही सगळे खूप एन्जॉय करत आहोत.
हे खूप खास आहे. माझ्या प्रिय मोईन बेग यांना 14 वर्षांपूर्वी कल्पना आली होती, पण अखेर ती प्रत्यक्षात आली आहे. मी डोक्याने चित्रपट बनवत नाही तर मनाने बनवतो. हीरा मंडीला खूप खास स्थान आहे".
'हीरामंडी' चित्रपटाचा टीझर शनिवारी प्रदर्शित झाला आहे. संजय लीला भन्साळी म्हणतात की, हा त्यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. फिल्मसिटीमध्ये हीरामंडीचा एक मोठा सेट तयार करण्यात आला आहे, नेमकी तीच जागा जिथे गंगूबाई काठियावाडीचा सेट पूर्वी बनवला होता. बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे.